Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची सर्वात मोठी घोषणा; बजेट सादर करताच म्हणाले…

Maharashtra Budget 2026 : राज्यातील लाडकी बहिण योजनेबाबत आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्यात आला. आता हा निर्णय काय आहे जाणून घ्या...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची सर्वात मोठी घोषणा; बजेट सादर करताच म्हणाले...
| Updated on: Mar 06, 2026 | 3:23 PM

राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. आता ही घोषणा काय आहे जाणून घ्या…

काय आहे घोषणा?

आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर सर्वांना उत्सुकता असलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ही योजना अशीच सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना अशीच सुरु राहणार आहे. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. काळजी करु नका. तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय, आम्हीच करणार. फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका. योजनेच्या विरोधाच फक्त कोर्टात जाऊ नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.

लाभार्थी महिलांना केवायसी अपडेट करण्याचे आवाहन

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमुळे गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहि‍णींना हप्ता मिळाला नव्हता. काही महिलांचे तीन महिन्यांचे हफ्ते अडकले होते. मात्र आता सरकारने जानेवारीचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांना एक दोन दिवसांमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनेक महिला पात्र आहेत, मात्र त्यांनी केवायसी केली नसल्याने त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आहे. केवायसी अपडेट न केलेल्या महिलांनी तातडीने केवायसी करून घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच यापुढेही पात्र महिलांसाठी ही योजना सुरु राहणार आहे.

Follow Us