दावोसमध्ये आजही विक्रमी करार, किती कोटींची गुंतवणूक? किती लाख रोजगाराच्या संधी? देवेंद्र फडणवीसांनी दिली संपूर्ण माहिती

दावोसमध्ये झालेल्या करारात देश-विदेशी गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. औद्योगिक मँगेट क्षेत्रात MOU केले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

दावोसमध्ये आजही विक्रमी करार, किती कोटींची गुंतवणूक? किती लाख रोजगाराच्या संधी? देवेंद्र फडणवीसांनी दिली संपूर्ण माहिती
devendra fadnavis
| Updated on: Jan 23, 2025 | 7:21 PM

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) राज्य सरकारने आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या केल्या आहेत. यात विविध उद्याोग समूह आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या करारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आज झालेल्या करारानुसार 15.70 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असे म्हटले आहे. यातून तब्बल १६ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत ६१ सामंजस्य करारांवर सह्या केल्याचे म्हटले आहे. यातून एकूण १५ लाख ७० कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. यात विदर्भ, MMR, नाशिकसह मराठवाड्यासाठी करार करण्यात आले. यातून १६ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

दावोस दौऱ्यात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी शिकायला मिळाल्या. महाराष्ट्राची शक्ती काय आहे, ती मांडण्याची संधी मिळाली. तसेच वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधींसोबत संवाद साधला. भारत म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडता आली. राज्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करता आल्या, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

दावोसमध्ये झालेल्या करारात देश-विदेशी गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. औद्योगिक मँगेट क्षेत्रात MOU केले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

महत्त्वाचे सामंजस्य करार

१) कंपनीचे नाव : क्रॉसरेल इंटरनॅशनल (यूके) + यूके वाहतूक विभाग
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास आणि कार्यक्षमतेतील सुधारणा
एकूण गुंतवणूक : धोरणात्मक अभ्यासासाठी सहाय्य

२) कंपनीचे नाव: यूनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम सेंटर फॉर रेल्वे रिसर्च अँड एज्युकेशन, यूके
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) शाश्वत शहरी वाहतूक साध्य करणे
एकूण गुंतवणूक: धोरणात्मक अभ्यासासाठी सहाय्य

३) कंपनीचे नाव: ब्रुकफिल्ड कॉर्पोरेशन (कॅनडा)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक: १२ अब्ज डॉलर्स

४) कंपनीचे नाव: ब्लॅकस्टोन इन्क. (यूएसए)
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशाततील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक: ५ अब्ज डॉलर्स

५) कंपनीचे नाव : टेमासेक कॅपिटल मॅनेजमेंट पीटीई लिमिटेड (सिंगापूर)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे.
एकूण गुंतवणूक : ५ अब्ज डॉलर्स

६) कंपनीचे नाव : सुमिटोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (जपान)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे.
एकूण गुंतवणूक : ५ अब्ज डॉलर्स

७) कंपनीचे नाव : हिरानंदानी ग्रुप (भारत + दुबई)
सामंजस्य करार : शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक: ६ अब्ज डॉलर्स

८) कंपनीचे नाव : के. रहेजा कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड (भारत + सिंगापूर)
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक : ५ अब्ज डॉलर्स

९) कंपनीचे नाव: एव्हरस्टोन ग्रुप (सिंगापूर)
सामंजस्य करार: शहरी, प्रादेशिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक : १ अब्ज डॉलर्स

१०) कंपनीचे नाव : सोतेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड (भारत + स्वित्झर्लंड)
सामंजस्य करार: एमएमआरमध्ये पार्किंग सोल्यूशन्समध्ये बदल घडवून आणण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीद्वारे (एफडीआय) मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक वाढीस चालना देणे
एकूण गुंतवणूक : १ अब्ज डॉलर्स

११) कंपनीचे नाव : एमटीसी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड + मित्सुई (भारत + जपान)
सामंजस्य करार : मुंबई महानगर प्रदेशात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क विकसित करणे
एकूण गुंतवणूक : सर्क्युलर इकॉनॉमी सहाय्य