पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार; मुख्यमंत्र्यांनी PM मोदींसमोरच सांगितला विकासाचा प्लान

pune metro : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला आहे. यावेळी त्यांनी मेट्रोची पायलट देखील महिलाच असणार असल्याचे सांगितले.

पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार; मुख्यमंत्र्यांनी PM मोदींसमोरच सांगितला विकासाचा प्लान
devendra fadnavis
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 1:42 PM

पुणे ‘मेट्रो 3’चे आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं. या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या समोरच पुण्याच्या विकासाचा प्लान सांगितला. पुढील चार वर्षात पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल. पुण्यातील अनेक प्रकल्पांचं जाळ तयार झाल्यानंतर पुणेकर सहजतेने प्रवास करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अतिशय आनंदाची बाब आहे की, ज्या मेट्रोचं भूमीपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्याच मेट्रोचं उद्घाटन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. मोदींचा हा विक्रम राहिला आहे. ज्या ज्या प्रकल्पाचं भूमीपूजन हे मोदींनी केलं. त्या त्या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. आजच्या मेट्रोचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होत आहे. भारताने नवीन नीती स्वीकारली आहे. पीपीपी मोडवर कामे सुरू करण्यात आली. देशातील खासगी गुंतवणूक देखील प्रकल्पात वापरली जात आहे. या धोरणाअंतर्गत हा शिवाजीनगर ते हिंजवडी अंतर्गत पहिला प्रकल्प झाला. या मेट्रो प्रकल्पाचं काम टाटा सन्स आणि सिमेन्सच्या मदतीने होतंय. या दोन्ही कंपन्याचे आभार मानतो. भारत सरकारने मान्यता दिली तसेच सहकार्य देखील केलं. आज हा प्रकल्प तयार होत आहे. हिंजवडीला आयटीची राजधानी म्हणून पाहिलं जातं. हजारो-लाखो लोक या परिसरात येतात. अनेकांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीत अडकावं लागत होतं. अनेकांच्या नजरा या प्रकल्पाकडे लागल्या होत्या. ही पिंक लाईन आहे. ही मेट्रो संपूर्णपणे महिला संचलित असेल’.

Loading...

‘मोदींच्या नेतृत्वात 120 किमी मेट्रो लाईनचं जाळं तयार होत आहे. मेट्रोच्या विस्ताराचा लाभ हा महाराष्ट्राला झाला. सर्वात अधिक मेट्रो जाळे महाराष्ट्रात झाले. 12 नगरपालिका क्षेत्रात मेट्रोचं काम सुरू आहे. मोदींनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली. या मेट्रोमुळे रोजगार निर्माण होईल. या मेट्रोच्या माध्यमातून इकोसिस्टम तयार होतेय. तुम्ही 5 हजार कोटी रुपये दिले. त्या माध्यमातून असे प्रकल्प तयार करत आहोत. तुमच्या आशीर्वादाने 2030 सालापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए  भागात मोबिलिटीचं केंद्र होईल.  पुण्यात नागरिक सहजतेने एका ठिकाणावरून दुसरीकडे प्रवास करतील. कारण मोदींच्या आशीर्वादाने अनेक प्रकल्पांचं जाळं तयार होत आहे. त्यामुळे पुणे फक्त इकॉनॉमिक इंजिन, आयटी इंजिन नव्हे. तर तंत्रज्ञानाचं केंद्र देखील तयार होईल. पुण्यातील प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम केलं जाईल, असे फडणवीसांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us