दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्हाला…, अखेर कोंडी फोडली

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्हाला..., अखेर कोंडी फोडली
Breaking News
| Updated on: Nov 07, 2026 | 4:14 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, परंतु जर अजित पवार असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं. त्यांनी मला याबाबत कल्पना दिली होती, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला होता. यावरून आता चर्चेला उधाण आलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. शेवटी हे दोन पक्ष आहेत, ते त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, मात्र असा काही निर्णय घेतला तर ते आम्हाला ग्राह्य धरतील असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us