AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IL 76 Landing : इंडियन एअर फोर्सने जगाला क्षमता दाखवली, 13,629 फूट उंचीवर ‘गजराज’चं यशस्वी लँडिंग, चीन बॉर्डर जवळ भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड

IL 76 Landing Nyoma Air Base : इंडियन एअर फोर्स ही जगातील प्रोफेशनल फोर्स आहे. ऑपरेशन सिंदूर आणि अन्य देशांसोबत युद्ध सरावामध्ये IAF ने आपल्या कौशल्याचा अनेकदा परिचय दिला आहे.

IL 76 Landing :  इंडियन एअर फोर्सने जगाला क्षमता दाखवली, 13,629 फूट उंचीवर 'गजराज'चं यशस्वी लँडिंग, चीन बॉर्डर जवळ भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड
IAF Plane
| Updated on: Nov 07, 2026 | 4:15 PM
Share

इंडियन एअर फोर्सने पुन्हा एकदा आपली क्षमता सगळ्यांना दाखवून दिलीय. एअर फोर्सच्या IL-76MD या ट्रान्सपोर्ट विमानाने पूर्व लडाखच्या न्योमा एअर बेसवर यशस्वी लँडिंग केलं. समुद्र सपाटीपासून 13,629 फूट उंचीवर या विमानाने लँडिंग झालं. पहिल्यांदाच IL-76MD या ट्रान्सपोर्ट विमानाने जगात इतक्या उंचीवर लँडिंग केलय. या लँडिंगमुळे विमान किती मजबूत आहे, एवढच दिसलं नाही तर पायलटचं कौशल्य, अचूकता आणि प्रोफेशनलता दिसून आली. न्योमा एअरबेस लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल म्हणजे वास्तविक नियंत्रण रेषेपासून फक्त 25 किलोमीटर लांब आहे. इथे एक अवजड विमान उतरणं ही सोपी गोष्ट नाहीय. IL-76MD या विमानाला ‘गजराज’ सुद्धा म्हटलं जातं.

पातळ हवेमध्ये इंजिनची शक्ती कमी होते. लिफ्टची क्षमता सुद्धा घटते. अशावेळी लांब रनवे आणि खूप सावधतेची गरज असते. या यशस्वी लँडिंगमुळे इंडियन एअरफोर्स उंचावरील कठिण क्षेत्रातही विमानांचं संचालन करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. न्योमाला पहिलं एडवांस्ड लँडिंग ग्राउंड म्हटलं जातं. 1962 च्या युद्धावेळी हा एअर बेस सुरु केलेला. नंतर बराच काळ हा एअर बेस बंद होता. 2009 मध्ये AAN-32 विमानाच्या लँडिंगने पु्न्हा हा एअर बेस सक्रीय झाला. अलीकडच्या काही वर्षात सीमा रस्ते संघटनेने या एअर बेसला आधुनिक बनवलय. जवळपास 2.7 ते 3 किलोमीटर पर्यंत पक्की धावपट्टी तयार केली आहे.

या लँडिंगचे भविष्यात फायदे काय?

2025 साली सी-130 जे विमानाच्या लँडिंगने औपचारिकरित्या हा एअर बेस सुरु झाल्याचं एअर फोर्स प्रमुखांनी जाहीर केलं. आता न्योमाची जगातील उंचावरील फायटर कॅपेबल एअरफिल्डसमध्ये गणना होते. या एअर बेसमुळे चीन बरोबर तणावाच्यावेळी वेगाने सैन्याला शस्त्रास्त्र आणि अन्य रसद पुरवता येईल. त्याशिवाय सैनिकांची अतिरिक्त कुमकही तैनात करता येईल. लडाखच्या सारख्या दुर्गम भागात रस्ते मार्गाने सामाना पोहोचवण्यासाठी अनेक दिवस लागतात. हवाई मार्गामुळे काही तासात हे शक्य होतं. चीन सीमेजवळ भारताकडे अशी क्षमता असणं हे सर्वात जास्त जमेची बाजू आहे.

पातळ हवेमुळे इंजिनचं थ्रस्ट कमी होतं

IL-76MD ला एअर फोर्सचं गजराज म्हटलं जातं. रशियन बनावटीचं हे चार इंजिनवालं ट्रान्सपोर्ट विमान आहे. 40 टन वजन वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे. यात सैनिक, वाहन, तोपा आणि अन्य सैन्य साहित्य नेता येऊ शकतं. उंचावरील क्षेत्रात या विमानाचं लँडिंग आव्हानात्मक असतं. कारण पातळ हवेमुळे इंजिनचं थ्रस्ट कमी होतं. रनवेची लांब आणि हवामानाची स्थिती सुद्धा महत्वपूर्ण ठरते.

Follow Us
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?