देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती, ते…चंद्रकांत पाटलांचे विधान!

देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली असं काम त्यांनी केलं का? देवेंद्र फडणवीस यांनी मतं मिळविण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती, ते...चंद्रकांत पाटलांचे विधान!
devendra fadnavis and chandrakant patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2026 | 5:46 PM

Chandrakant Patil And Devendra Fadnavis : भाजपाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील सध्या चर्चेत आहेत. दिल्ली पोलीस सीजेपीने केलेल्या आंदोलनस्थळी जाऊन दगड गोळा करत आहेत. या दगडांपासून फिंगरप्रिंट घेऊन गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. दरम्यान, आता पुण्यात बोलाना फडणवीस यांना दैवी शक्ती मिळाल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. पुण्यात देवभाऊ नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केले.

देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या महापौर

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख त्यांनी या कार्यक्रमांत केला. “देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या महापौर झाले. राज्य महापौर परिषदेचे ते अध्यक्ष होते. आज माझी रक्ताची तपासणी होती. तरीदेखील मी या कार्यक्रमाला आलो, असं चंद्रकांत पाटील फडणवीसांबद्दल बोलताना म्हणाले.

मी असे एक मुख्यमंत्री पाहिले जे….

तसेच, देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती मिळाली आहे. सर्व बाबतीत ते सर्वगुणसंपन्न आहेत. मी असे एक मुख्यमंत्री पाहिले जे पेन काढायचे आणि निवेदन वर खुणा करायचे. निवेदन घेऊन आलेल्या अनेकांसोबत ते असेच करायचे आणि सांगतो म्हण्याचे, असं भाष्य करत देवेंद्र फडणवीस हे पेन काढून 60 कोटी निधीच्या पॅसेजवर सही करतात, अशी वाहवाही त्यांनी केली.

फडणवीसांनी अभ्यास केला म्हणून…

देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली असं काम त्यांनी केलं का? देवेंद्र फडणवीस यांनी मतं मिळविण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही. समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी मिटविन्यासाठी त्यांनी हे काम केलं, अशी स्तुती चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांची केली. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास केला म्हणून मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र मी उद्धव ठाकरे यांना मी दोष देत नाही. तेव्हा कोव्हिड काळ होता. त्यामुळे तेव्हा मराठा आरक्षण टिकलं नाही, असंही मत पुढे चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us