AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: त्यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत, राज ठाकरे यांचा या नेत्याला सणसणीत टोला, सभेत एकच हश्या

Raj Thackeray on Chandrakant Patil: मुंबईतील मनविसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी खणखणीत भाषण केले. यावेळी त्यांनी सरकारवर आसूड ओढला. CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनातील दगड गोळा करून त्यावरील फिंगरप्रिंट आधारे दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात येईल, या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी सणसणीत टोला हाणला.

Raj Thackeray: त्यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत, राज ठाकरे यांचा या नेत्याला सणसणीत टोला, सभेत एकच हश्या
राज ठाकरे, चंद्रकांत पाटील
| Updated on: Aug 01, 2026 | 12:36 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडली. त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. सरकारवर सडकून टीका करतानाच त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आसूड ओढला. देशातील परिस्थितीवर राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. त्यांनी जेन झी ही पिढी केवळ शहरात राहते असे नाही तर ती ग्रामीण भागत असल्याचेही सर्वांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी तरुणाईला मोठा संदेश दिला.

टेलिग्राम ते इन्स्टाग्राम ही पिढी पाहिली

विद्यार्थ्यांनो आणि कधीकाळी विद्यार्थी असलेल्यांनो. बघायला आला का ऐकायला. लाईट बंद कर. माझं डोकं दुखायला लागतो. आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आहे. खूप वर्ष झाली. माझी राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी सेनेतून झाली. काम करत, घडत घडत इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील अशी आशा आहे. ज्या सदस्य नोंदणीलाही भरघोस प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा करतो. एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आपला वर्धापन दिन आलाय, असे राज ठाकरे म्हणाले.

मी जेव्हा कामाला सुरुवात केली, तेव्हा काळ वेगळा होता. विषय वेगळी होती. तेव्हाचे विद्यार्थी आताचे विद्यार्थी वेगळे आहेत. आम्ही तो काळ टेलिग्रामपासून ते इन्स्टाग्रामपर्यंत पाहिला. आताच्या जेनजी.. ९७पासून जे जन्माला आले. ते २०११पर्यंतचे. २०१२पर्यंतचे. तेच ते. त्या मुलांचं म्हणणं काय. त्यांना काय हवंय. इंग्रजी बोलणारे फक्त जेनजी नसतात. माझे विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे. ९७ नंतर जन्माला आलेली मुलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. मुंबई, पुणे दिल्लीचे फक्त जेनजी नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आशा काय यांना काय हवं. ही गोष्ट समजून घेणं गरजेची आहे. जुन्या कल्पना होता. त्याही आता सोडून दिल्या पाहिजे, असे आत्मभान मनसे अध्यक्षांनी तरुणाईला दिले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका

आम्ही लहान असताना आमचे आईवडील सांगायचे डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा. बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपड चोपड चोपडलं पण बुद्धी आली नाही, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना हाणला. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतो आपण काय करतो. जग कुठे चाललंय. शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री.दगडावरच्या फुटप्रिंट. ते म्हणे लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून पुण्यात पाठवलं. शिक्षणाचं माहेरघर आहे. तिथेही काही झालं नाही. असे शिक्षणमंत्री म्हटल्यावर जेनजीचा पारा चढणार की नाही चढणार.अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवली आहे, असा खरपूस समाचार राज ठाकरे यांनी घेतला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा