पुण्यात CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शाह यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

राज्यात आणि देशात येत्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात सहकार क्षेत्राच्या कार्यक्रमासाठी आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री भेट घेऊन चर्चा केल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यात CM देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शाह यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Amit shah and devendra fadnavis
| Updated on: Nov 15, 2026 | 10:55 PM

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आज पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.पुण्यातील तळेगाव येथे नेशन हेव्ही इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव लिमिटेड मल्टी स्टेट सहकारी संस्थेच्या भूमिपूजन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यांच्या कार्यक्रमानंतर गृहमंत्री पुण्याच्या सेनापती बापट रोडवरील जेडब्ल्यू मेरीट हॉटेलमध्ये दाखल झाले.तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची रविवारी रात्री उशीरा भेट घेतली. उभय नेत्यात दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. केंद्र सरकारने डिलिमिटेशन बिल पुन्हा एकादा संसदेत आणण्याच्या तयारीत आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादींचा विलीनीकरणाचा घोळ सुरु आहे. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिलावर सरकारच्या धार्जिणी भूमिका मांडल्याने या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिले जात आहे.

गृहमंत्री अमित शाह रविवारी सकाळी पुण्यातील एका कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नुकतेच गोकूळ सहकारी दूध संघात काँग्रेसचे सतेज पाटील यांचे पॅनल बहुमताने येऊनही महायुतीने गोकूळवर सरकारी अध्यादेश आणून आपला अध्यक्ष बसवला आहे. या अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरात सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. त्यातचे शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सतेज पाटील यांनी आयुष्यातून उठवू अशी जाहीर धमकी दिल्याने राजकीय वातावरण ढवळून गेले असतानाच गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी पुण्यातील नेशन हेव्ही इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव लिमिटेड मल्टी स्टेट सहकारी संस्थेच्या भूमिपूजन समारंभात अध्यक्ष स्थान भूषवले आहे. यावेळी अमित शाह यांनी भाषणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका केली. त्यानंतर रात्री गृहमंत्री अमित शाह यांची जेडब्ल्यू मेरीट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत दोन तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी आगामी डिलिमिटेशन बिल आणि दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण या संदर्भात ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे.

Loading...

सुप्रिया सुळे यांचे सूचक वक्तव्य

दुसरीकडे, भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी महिला आरक्षण बिलासाठी आमच्याकडे पुरेसे बहुमत आहे. आम्हाला राष्ट्रवादीच्या खासदारांची गरज नाही असे वक्तव्य केले आहे.  तर,दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व राज्याच्या ५० टक्के जागा वाढणार असतील तर चांगलेच आहे, नेमके बिल काय आहे हे तर अभ्यासूयात असे म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी माझा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये जर तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांची रात्री पुण्यात भेट घेऊन दोन तास चर्चा केल्याने नेमके या बैठकीत काय ठरले याकडे लक्ष लागले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us