AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री तानाजी सावंत यांच्या शेतकरी मेळाव्यात शिंदेंचा फोटो बॅनरवरुन गायब, शिवसैनिक नाराज

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या शेतकरी मेळाव्याच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. मंत्री सावंत यांच्यामुळे धाराशिव जिल्ह्यात गटबाजी झाल्याचा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अमर राजे कदम यांचा आरोप आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्या शेतकरी मेळाव्यात शिंदेंचा फोटो बॅनरवरुन गायब, शिवसैनिक नाराज
तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 24, 2024 | 10:01 PM
Share

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रमाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नसल्याने धाराशिव जिल्ह्यात काही शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक यांच्यामध्ये नाराजी असल्याचं दिसलं. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे आज आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या तेरणा कारखान्यावरती शेतकरी संवाद मेळावा पार पडला. त्या मेळाव्याचे बॅनर धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या बॅनरवरती शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप असा उल्लेख असला तरी मुख्यमंत्र्याचा फोटो मात्र या बॅनरवरून गायब झाल्याचे दिसत आहे. तुम्ही शिवसेना लिहित आहात, मग मुख्यमंत्री यांचा फोटो का बॅनरवरती नाही? असा सवाल शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी यांनी उपस्थित केलाय.

मंत्री सावंत यांच्यामुळेच धाराशिव जिल्ह्यात गटबाजी निर्माण झाली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रन नसल्याने शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री सावंत हे कुठल्याच कार्यक्रमाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देत नाहीत. फक्त ठराविकच पदाधिकारी सोबत घेत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हासहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी केलाय. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत झालेली गटबाजी आम्ही लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरती घालणार असल्याचेही कदम यांनी सांगितलं आहे.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा