CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा 8.30 वा जनतेशी संवाद, काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष

| Updated on: May 30, 2021 | 3:31 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. (CM Uddhav Thackeray Address State Today Live Update)

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा 8.30 वा जनतेशी संवाद, काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी (30 मे 2020) रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. यावेळी ते कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करणार आहे. (CM Uddhav Thackeray Address State Today Live Update)

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे आज रविवार 30 मे 2021 रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतील, असे सांगितले आहे.

‘या’ विषयांवर संवाद

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे सरकार लॉकडाऊन (Lockdown) उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे आज संवाद साधण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती काय? 

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतं आहे. राज्यात काल दिवसभरात 20,295 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात काल 20,295 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 443 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर हा 1.65 टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल 20,295 नवीन रुग्ण सापडल्यानंतर सद्यस्थितीत 2,76,573 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,13,215 झाली आहे.

1 जूनपासून लॉकडाऊन उठवणार?

दरम्यान या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. (CM Uddhav Thackeray Address State Today Live Update)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, लक्षणं ओळखून रुग्णांवर वेळीच उपचार करा : उद्धव ठाकरे