AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रणित मोरे याला मोठा दणका, अखेर गृह विभागाकडून मोठे आदेश, आता खैर नाहीच..

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. प्रणित मोरे याच्या व्हिडीओबाबत गृह विभागाकडून मोठे आदेश देण्यात आले. ज्यामुळे आता प्रणित मोरे याला कोणीही वाचू शकत नसल्याचे स्पष्ट आहे. प्रणित मोरे याचा शो चांगलाच वादात सापडला.

प्रणित मोरे याला मोठा दणका, अखेर गृह विभागाकडून मोठे आदेश, आता खैर नाहीच..
Comedian Pranit More
| Updated on: Jun 13, 2026 | 10:13 AM
Share

कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरे याच्या शोमध्ये अश्लील गोष्टी बोलल्या जातात. ज्याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले, ज्याने संताप वाढला. एका मुलाने सांगितलेला बिर्याणीचा किस्साही धक्कादायक आहे. आता प्रणित मोरे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आधीच्या सर्व व्हिडीओची चाैकशी केली जाणार आहे. हा मोठा दणका प्रणित मोरे याला म्हणावा लागेल. गृह विभाग राज्यमंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे. अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेन्टची सायबर पोलिसांकडून सखोल चाैकशी केली जाईल. विकृत विनोद समाजात कोणीही करू नये, असेही पंकज भोयर यांनी म्हटले आहे.

यादरम्यान बोलताना पंकज भोयर यांनी म्हटले की, विकृत विनोद करणे उचीत नाही. याची सखोल चाैकशी होईल. महिला आयोगाने देखील नोटिस दिलेली आहे. आमचे सायबर सेल देखील यावर चाैकशी करत आहेत. निश्चितपणे यावर योग्य ती कारवाई केली जाईल. महिला आयोगानेही यासंदर्भात नोटीस दिलेली आहे. या समाजात अशाप्रकारचा विकृत विनोद कोणीही करू नये.

आपला देह हा समाजात कामाकरिता आला पाहिजे, म्हणून लोक देहदान करतात. अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य होत असतील तर हे निंदनीय आहे. अशा पद्धतीचे कोणी जरी कृत्य करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. म्हणजेच काय तर फक्त हे दोनच व्हिडीओ नाही तर यापूर्वी प्रणित मोरे याच्या शोमधील जितके व्हिडीओ व्हायरल झाली, त्या सर्वांची चाैकशी केली जाणार आहे.

शोमधील अश्लील गोष्टींमुळे प्रणित मोरे याचा शो वादात कायमच सापडला. मात्र, यावेळी जरा प्रणित मोरे जास्तच अडकल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता गृह विभागाकडून चाैकशीचे आदेश देण्यात आले. प्रणित मोरे याच्या शोवर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे. यासोबचत त्या महिला डॉक्टरवरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
Aaditya Thackeray PC | MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा, मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं!
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी