AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana : अपघातानंतर संतप्त महिलेने चालकाला चपलेने मारमार मारले; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?

बुलडाण्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे.  सुंदरखेड जवळ भरधाव काँक्रेट मिक्सर उलटल्याने काँक्रेट मिक्सरच्या खाली दबून रस्त्याच्या कडेला पार्क केलेले चार दुचाकी वाहने चक्काचूर झाले.

Buldana : अपघातानंतर संतप्त महिलेने चालकाला चपलेने मारमार मारले; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?
नंदुरबारमध्ये चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात
| Edited By: | Updated on: Sep 01, 2022 | 1:21 PM
Share

बुलडाणा : बुलडाण्यातून (Buldana) एक विचित्र अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे.  सुंदरखेड जवळ भरधाव काँक्रेट मिक्सर (Concrete mixer) उलटल्याने काँक्रेट मिक्सरच्या खाली दबून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चार दुचाकी वाहने चक्काचूर झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र वाहनाचा चालक आणि ऑपरेटर किरकोळ जखमी झाले. मात्र ज्या दुचाकींचा चुराडा झाला होता त्यापैकीच एका दुचाकी मालकाच्या आईने दुचाकीचे नुकसान झाल्याच्या रागातून  मिक्सर चालकाला चपलेने चांगलाच चोप दिला या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  वरवंड ते उन्द्री मार्गाचे काम बंद पडले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी पुन्हा या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याच कामासाठी काँक्रिट भरून काँक्रिट मिक्सर हे बुलडाण्यावरून वरवंडच्या दिशेने निघाले होते.

सुंदरखेडजवळ अचानक रस्त्यात वासरू आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मिक्सर रस्त्याच्या कडेला अचानक पलटी झाले. मात्र हे काँक्रिट मिक्सर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर पलटी झाले. या अपघातात चार दुचाक्यांचा चक्काचूर झाला.

चालकाला मारहाण

ही घटना जेव्हा घडली तेव्हा ज्या दुचाकींचं अपघातात नुकसान झालं आहे, त्यापैकीच एक असलेल्या दुचाकीच्या मालकाची आई तिथेच होती. दुचाकीचे झालेलं नुकसान पाहून महिलेचा संताप अनावर झाला. तीने  चालकाला चपलेनं मारलं.

कुठलीही जीवितहानी नाही

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. चालक आणि ऑपरेटर किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र हे काँक्रिट मिक्सर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर पलटी झाल्याने या अपघातात चार दुचाकींचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर दुचाकीचे नुकसान पाहून महिलेला संताप अनावर झाला आणि तिने संतापाच्या भरात चालकाला चपलेने चांगलेच मारले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी