मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजमधील संघर्ष विकोपाला, भाजपकडून युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा

उल्हासनगर मध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष विकोपाला गेला आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेऊन उल्हासनगर मध्ये युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली तर यापुढे कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता काम करण्याची भूमिका घेतली आहे.

मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजमधील संघर्ष विकोपाला, भाजपकडून युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा
उल्हास नगरमध्ये शिवसेना -भाजप आमने-सामने
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 9:35 PM

उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष विकोपाला गेला आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेऊन उल्हासनगरमध्ये युतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली तर यापुढे कोणत्याही निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना सहकार्य न करता काम करण्याची भूमिका घेतली. नुकत्याच पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून सध्या शिवसेना आणि भाजपात संघर्ष सुरू झाला आहे.

दरम्यान याच पत्रकार परिषदेला शिवसेनेने देखील प्रत्युत्तर देत आम्ही युतीमध्येच असल्याचं स्पष्टीकरण दिलं. तर पप्पू कलानी गॅंग स्टार असतील तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंचेकर गँगचे ऑपरेटर असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी पत्रकार परिषदेतून केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवावे रवींद्र चव्हाण केवळ कल्याण डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला दाखवून देईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरमध्ये भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसून येतोय.

Loading...

दरम्यान दुसरीकडे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील महायुतीमध्ये बंडाची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. पुण्याच्या दोन्हा जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. परंतु पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश चिवटे हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते येत्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन सानप यांनी देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. ते याच मतदारसंघातून अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला पुण्याचे दोन मतदारसंघ तर नागपूर मतदार संघ आला आहे. या तीन जागांसाठी भाजपने 15 संभाव्य उमेदवारांची नावं पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us