एसपीपीयूच्या पीएचडीच्या मॉकटेस्टमध्ये गोंधळ, विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क होत नसल्याने विद्यार्थी संतापले…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून त्यावर मॉक टेस्ट देण्यासाठी बंधनकारण केले आहे.

एसपीपीयूच्या पीएचडीच्या मॉकटेस्टमध्ये गोंधळ, विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क होत नसल्याने विद्यार्थी संतापले...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 03, 2022 | 3:15 PM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 6 नोव्हेंबरला पीच.डी प्रवेश परीक्षा होणार आहे. आणि 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक देखील विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यावर पीआरएन आणि पासवर्ड देण्यात आला आहे. परंतु यामध्ये मॉक टेस्ट अनिवार्य केली असून 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबरला सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे सकाळी 10 वाजेपासून विद्यार्थी लॉगिन करून मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला यश येत नाहीये. यंदाच्या वर्षी अनेक मार्गदर्शकांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी पीच. डी. करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. असे असले तरी साडेचार तास उलटून गेले तरी अनेक विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देता येत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे. दरम्यान याबाबत विद्यापीठाशी संपर्क केल्यानंतर तांत्रिक अडचण आल्याचे सांगण्यात आले असून लवकरच सोडवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पीच. डी. ची परीक्षा न झाल्याने यंदाच्या वर्षी पीच. डी. च्या संदर्भात अनेक विद्यार्थी वाट बघत होते.

त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात याबाबत अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार विद्यापीठाने याबाबत 6 नोव्हेंबरला परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून त्यावर मॉक टेस्ट देण्यासाठी बंधनकारण केले आहे.

त्यासाठी आज सकाळी 10 वाजेपासून ही सुविधा सुरू होणार होती, मात्र साडेचार तास उलटून गेलेले असतांना लॉगिन साठी भरलेली माहिती चुकीचा असल्याचे दिसून येत होते.

विद्यापीठात संपर्क केल्यानंतर याबाबत 3 वाजेनंतर ही प्रक्रिया सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. असून वेळ वाढवून दिला जाणार आहे.

जवळपास 3 हजार 800 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. साधारणपणे दरवर्षी 10 हजार विद्यार्थी परीक्षा देत असतात. त्यातील 3 हजार विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश मिळत असतो.

यंदा प्रवेश क्षमता वाढल्याने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे. 12 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.