
मुंबईसह राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील काही पक्षांमध्ये अजून बोलणी, चर्चेच्या फेऱ्याच सुरु आहेत. चर्चेचा गुऱ्हाळ अजून संपतच नाहीय. सूत्रांच्या हवाल्याने वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. अमुक एक पक्ष इतक्या जागा लढवणार. दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला इतक्या जागा येणार. चर्चा फिस्कटली, चर्चा सुरु आहेत अशा बातम्या रोज सुरु आहेत. या दरम्यान आता पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यामध्ये दोन पक्षांनी बाजी मारली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, तर दुसऱ्याबाजूला मुंबईत युती, आघाडीची बोलणीच संपत नाहीय. मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे मुंबईची निवडणूक लढतोय.
“जिथे शक्य तिथे आघाडी करा असा आदेश आहे. भाजपने आघाडी केलेले पक्ष सोडून, आम्हाला समविचारी पक्षांशी आघाडी करण्याच्या सूचना दिल्यात. मुंबई येथे स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या मध्ये अंतिम निर्णय होईल. जागा वाटपात आकडेवारी इकडे तिकडे होऊ शकेल. प्रत्येकाने दोन पावले मागे घेऊन कार्यकर्त्याच्या भावनांचा आदर केला पाहिजे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
सोलापूर काँग्रेस यादी
त्यांनी काय करायचं तो त्यांचा अधिकार
“दुसऱ्याच्या घरात काय चाललय तो डोकावण्याचा अधिकार मला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादींच्या चर्चा खूप पुढे गेल्याचं मी ऐकलं आहे. घड्याळ किंवा तुतारी यावरून लढण्याचा त्यांचा विषय होता. त्यांच्या बैठका झाल्या तेव्हाच आम्ही निर्णय घेतला. जर शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत जात असतील तर आपला पक्ष स्वतंत्र लढेल. हा निर्णय आमच्या पक्षाने जाहीर केला आहे. त्यांनी काय करायचं तो त्यांचा अधिकार आणि आम्ही काय करायचं तो आमचा अधिकार. सध्या राज्यात राजकारणाचा झालेला चिखल त्यामुळे सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहेत. कितीही धुतलं तरी ते डाग पुसले जातील असं दिसून येत नाही” असं अजित पवार, सुप्रिया सुळे बैठकीवर विजय वडेट्टीवार म्हणाले.
समाजवादी पार्टी मुंबई यादी