विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! मोठा निर्णय घेतला; चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

Congress On MLC News: विधान परिषद निवडणुकांच्या निकालांचा सखोल अभ्यास करण्यासाठी काँग्रेसची चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये चार मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! मोठा निर्णय घेतला; चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
Congress Committee
| Updated on: Nov 03, 2026 | 5:53 PM

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा निकाल लागला आहे. यात तीन जागा महाविकास आघाडीला तर दोन जागा महायुतीला मिळाल्या आहेत. यानंतर आता काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर पदवीधर, पुणे पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांच्या निकालांचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसीम खान आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांचा समावेश आहे.

Loading...

ही समिती संबंधित मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया, पक्षाची प्रचार रणनीती, निवडणुकीतील विजय अथवा पराभवाची कारणे आणि पक्षांतर्गत समन्वयाचा सविस्तर आढावा घेणार आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाच्या पातळीवर काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच मागील काळातील निवडणुकांचा अभ्यास करून त्यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकांवर काही प्रतिकूल परिणाम झाला होता का, याचाही शोध घेतला जाणार आहे.

तसेच भविष्यातील निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने समिती आवश्यक शिफारसी करणार आहे. समितीने आपला सविस्तर अहवाल तीन आठवड्यांच्या आत महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्याकडे सादर करणार असून त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही देणार आहे.

भाजप-शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातही भाजपच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजपच्या उमेदवार स्मिता योगेश जाधव यांचा महाआघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्याकडून पराभव झाला. विदर्भातील अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान आमदार किरण सरनाईक पुन्हा विजयी झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us