Municipal Election Results : भाजपा सोडा काँग्रेसही सुस्साट… किती शहरात महापौर, ठिकाणी सत्ता?

Congress : महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Municipal Election Results : भाजपा सोडा काँग्रेसही सुस्साट... किती शहरात महापौर, ठिकाणी सत्ता?
Harshwardhan sapkal
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 7:51 PM

राज्यातील महानगर पालिकांचे निकाल हाती आले आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर 350 नगरसेवक आणि 10 ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे. त्यामुळे लातूर, परभणी, भिवंडी, कोल्हापूर, चंद्रपूर या शहरांमध्ये भाजपाचा महापौर असेल.

काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, संक्रातीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. जेथे शक्य आहे तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी करून काँग्रेस पक्षाने वैचारिक व संघटनात्मक वाढीसाठी निवडणूक लढली. सत्ताधारी भाजपा महायुतीने पैशाचा प्रचंड वापर केला, बोगस मतदान झाले, कुठलीही तडजोड न करता भाजपाच्या बुलडोझरसमोर काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. हा कार्यकर्त्यांचा विजय असून लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे, विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. हा काळ संघर्षाचा, वैचारिक लढाईचा आहे आणि काँग्रेस ही लढाई लढण्यास कटीबद्ध आहे. अपयशाने खचून न जाता पुढच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत.

Live

Municipal Election 2026

07:59 PM

Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...

07:46 PM

BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...

10:32 PM

BMC Election Result 2026 : आकडे खाली-वर होत होते, आता मुंबईत स्थिती काय?

09:03 PM

बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे

पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशिनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर करणे बंद करावे तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपाकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी, व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्री अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले.

सपकाळ यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘हुकमशाही वाढत वाढत जाते पण एका ठिकाणी त्याचा फुगा फटतो, आता हा फुगा फुटण्याचा क्षण जवळ आला आहे. कालच उत्तरायण सुरु झाले आहे पुढचा काळ भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे. भाजपाच्या विजयाचे वर्णन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, ‘करुन घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते सत्तेचा फेटा.’