नागपूरमध्ये काँग्रेसचा मोठा विजय, हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट भाजपावर मोठा आरोप, निवडणुकीत..
शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूकडून आरोप होत आहेत. त्यातच आता हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे विधान केले. या निवडणुकीत नक्की काय घडले, हे त्यांनी सांगितले.

नागपूरमधून धक्कादायक निकाल पुढे आला. या निकालाने मोठी खळबळ उडाली. त्यात आता महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले. हर्षवर्धन सपकाळ यांनी यादरम्यान मोठे विधान केले. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, नागपूरच्या निकालातून महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी. अभिजित वंजारी यांच्या विजयाला काँग्रेससाठी ऐतिहासिक यश आहे. नागपूरमध्ये भाजप आणि संघाला जनतेने नाकारल्याचा संदेश देशभरात गेला.संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन मिळत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केला. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा आणि राजकीय वजनाचा वापर केला. निवडणुकीत भाजपकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर.
पंतप्रधानपदावरील व्यक्तीने पदाचा दर्जा राखून सभ्य आणि संयमी वर्तन करावं, निकालाची प्रक्रिया सुरू असताना घाईघाईने ट्विट. मोदींच्या वर्तनातून अहंकार दिसत आहे. ट्विट डिलीट करावं लागल्याने पंतप्रधानांची नाचक्की झाली. मोदींच्या ट्विटवरून भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्य नेतृत्वाला चपराक. पाच मतदारसंघांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कामगिरीचं
तीन पदवीधर मतदारसंघांमध्ये काँग्रेसला यश . शिक्षक मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांचा वाढता हस्तक्षेप हा चिंतेचा विषय. निवडणुकांमध्ये पाकिटं, पैशांचा वापर, घोडेबाजार, जेवणावळी आणि पैठण्यांचं वाटप. निवडणुकीतील पैशांच्या वापरामुळे लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह. निवडणुकीतील निकालांपेक्षा लोकशाही आणि सामाजिक मूल्यांवर अधिक चिंतन करण्याची गरज. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये तडजोड होण्याचा.
मुख्यमंत्री कोण होणार, हे सत्ताधाऱ्यांनी आपापसात ठरवावं; मात्र जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. महाराष्ट्राला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचं सरकारला आवाहन. राज्यावर दुष्काळाचं संकट असताना मुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याच्या वाटपावरून राजकारण करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी आस्मानी आणि सुलतानी संकटं कारणीभूत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजकीय व्यवस्थेवर. जनतेने दिलेला कौल मान्य न करणं, हादेखील एक प्रकारचा व्होट चोरीचा प्रकार. सतेज पाटील यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या जनभावनेचा अनादर झाल्याचा आरोप. निवडणुकीतील जनमताचा आदर करण्याचं मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना आवाहन.
सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि सामान्य नागरिकांसाठी वेगळा न्याय असू नये. भाजपकडून सत्तेसाठी वाटेल ते प्रयत्न होत असल्याचा आरोप. आगामी काळात आणखी व्हिडिओ क्लिप्स समोर येणार. सरकार आणि मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका. अन्याय आणि सरकारचा दिखाऊपणा महाराष्ट्रातील जनता अधिक काळ सहन करणार नाही. लोकशाही आणि जनतेच्या अधिकारांसाठी काँग्रेस लढत राहणार असल्याची भूमिका.