सुप्रिया सुळेंशी डिलिमिटेशनवरून बोलणं झालं, पवारांची राष्ट्रवादी अधिवेशनात…; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंशी डिलिमिटेशनवरून बोलणं झालं आहे. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे,असा दावा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर केलं जाणार आहे. या अधिवेशनाआधी इंडिया आघाडीत फूट पडली आहे. या अधिवेशनात शरद पवारांच्या राष्ट्रवादी विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीच्या खासदारांनी विरोधात मतदान करावे, यासाठी इंडिया आघाडी, काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. या चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला.
खासदार वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. डिलिमिटेशवरून वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘आम्ही शरद पवारसाहेबांना भेटायला जाणार आहोत. आम्ही अधिवेशनात एकत्र लढण्याचे काम करू. पवार साहेबांची प्रकृतीची विचारपूस करणार आहे. आमचे शिष्टमंडळ भेटणार आहे. मागच्या वेळी बिल पडले. मागच्या वेळी महिला विधेयक आले असते, तर 100 च्या महिला सदनात दिसल्या असतात. आम्ही उद्याही जिंकणार आहे. सकाळी माझी सुप्रिया ताईंशी सकाळीच बोलणे झाले, आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आमचा विरोध राहणार आहे. सकारात्मक चर्चा होणार असून पवार साहेबांसोबत आमचे आणि त्यांचे नाते फार जुने आहे. फडणवीसांना का चिंता आहे, एनसीपीची आधी तर खूप आरोप केले होते, त्यांनी सत्ता काबिज करण्यासाठी हे बिल आलेलं आहे. एम के स्टॅलिन यांच्या भेटीवर काँग्रेस खासदार गायकवाड म्हणाल्या, ‘आमचे काम आहे, चर्चा करणे. आमची अपेक्षा होती, ते आमचे म्हणणे ऐकणार. मागच्या वेळी जे झाले, तेच होणार आहे. परत एकदा जनमत जिंकणार आहे’.
आमदार अस्लम शेख काय म्हणाले?
आमदार अस्लम शेख म्हणाले,दिल्लीत प्रस्तावित बिलावरून विरोधी नेत्यांमध्ये चर्चा आणि रणनीती सुरू आहे. खरगे, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते मुंबईत शरद पवार यांची भेट घेणार आहेत. डिलिमेटशनवरून या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधक आपले प्रस्ताव आणि पर्यायी सूचनांवर विचार करत आहेत. राजस्थानसह देशभरात अनेक ठिकाणी युवा रस्त्यावर उतरत आहेत. युवांना आता सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर प्रश्न विचारण्याची गरज वाटू लागली आहे’.