साहिल वाकोडे प्रकरणाने वातावरण तापलं, IIT मुंबईजवळ वर्षा गायकवाड यांचं आंदोलन; सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप

साहिल वाकोडे प्रकरणाने सामाजिक वातावरण तापलं आहे. या घटनेच्या विरोधात IIT मुंबईजवळ वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

साहिल वाकोडे प्रकरणाने वातावरण तापलं, IIT मुंबईजवळ वर्षा गायकवाड यांचं आंदोलन; सत्ताधाऱ्यांवर केले गंभीर आरोप
Varsha gaikwad
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 2:20 PM

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाचे पडसाद देशभर उमटू लागले आहेत. देशातील नामांकित आयआयटी मुंबई संस्थेत विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आयआयटी मुंबई संस्थेत शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याची आत्महत्या ही संस्थात्मक मृत्यू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर आयआयटी मुंबई संस्थने प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. दररोज आयआयटी मुंबई संस्थेच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. काल वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं. त्यानंतर आज गुरूवारी वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

खासदार वर्षा गायकवाड यांनी आयआयटी मुंबईतील घटनेवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरण हे संस्थात्मक मृत्यू प्रकरण आहे. या प्रकरणात कोणीतरी एक जबाबादर आहे. आयआयटी मुंबई आणि मुंबई विद्यापीठामध्ये विरोधाभास पाहायला मिळत आहे. या आयआयटी मुंबईत आरएसएसने शिरकाव केला आहे. आता संस्थेत धर्म-जातीयवाद सुरू झाला आहे. याला जबाबदार कोण आहे. ही पहिली घटना नाही. मागील काही वर्षांत 4 घटना घडल्या आहेत. यानंतरही कोणाला जबाबदार धरलं जात नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यांवर आहे. शिक्षणाचं आरएसएसकरण होत आहे. संस्थेत भेदभाव केला जात आहे. आम्ही सवाल विचारण्यासाठी आलो, तेव्हा आम्हाला रोखण्यात आलं आहे. आम्हाला पोलिसांनी थांबवलं आहे’.

साहिलचा शेवटचा सीसीटीव्ही समोर

साहिल वाकोडेच्या आत्महत्येच्या आधीचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्याचा परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही आला समोर आहे. समोरच्या बेंचवर साहिल वाकोडे परीक्षेला बसलेल्या या सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याच्या अवतीभवती दोन ते तीन प्रोफेसर पर्यवेक्षक म्हणून असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. पेपर लिहित असताना साहिलच्या समोर एक प्रोफेसर येऊन काहीतरी विचारताना दिसत आहेत. यानंतर काही वेळात साहिल बेंचवरून उठून जाताना दिसत असून मागून शिक्षकही जाताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us