AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट? पीएच्याच दाव्यानं खळबळ, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

बीज जिल्ह्यातील गेवराईमध्ये काल नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं, मात्र याचवेळी मोठा राडा झाल्याची घटना देखील समोर आली आहे. दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची देखील घटना घडली होती.

मोठी बातमी! माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट? पीएच्याच दाव्यानं खळबळ, घटनास्थळी नेमकं काय घडलं?
अमृत डावखर Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 3:34 PM
Share

मंगळवारी राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जरी सर्वत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं असलं तरी देखील काही ठिकाणी गालबेट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात काल नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे.  गेवराईमध्ये काल नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.  यादरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात  आली आहे. त्यानंतर आता अमृत डावखर यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले डावखर?  

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या-काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आल्याची माहिती अमृत डावखर यांनी दिली आहे. एवढेच नाही तर बाळराजे पवार यांनी आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी अमरसिंह पंडित यांच्या बाबत विचारणा केली, त्यांच्या खुनाचा कट रचूनच ते घरी आले होते, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता, त्यांच्यासोबत काही अनोळखी लोक होते. माझा देखील जीव गेला असता, मात्र गाडी चालकाने मला सोडवलं. अशा प्रकारचा धक्कादायक दावा, अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांनी केला आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

मारहाणीमध्ये डावखर गंभीर जखमी 

दरम्यान मंगळवारी ही घडना घडली आहे, मंगळवारी गेवराईमध्ये जोरदार राडा झाला. अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ते या घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यानंतर आता डावखर यांनी केलेल्या दाव्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार