ढगफुटीसदृश पाऊस, 50 हून अधिक गावांचा तुटला संपर्क, गडचिरोलीसह अमरावतीत..

Bhamragad Flood : राज्यातील जवळपास जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. सरकारने दुष्काळ जाहीर केला. अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आला. त्यातच आता गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यात पावसाने कहर केला.

ढगफुटीसदृश पाऊस, 50 हून अधिक गावांचा तुटला संपर्क, गडचिरोलीसह अमरावतीत..
Bhamragad Flood
| Updated on: Sep 27, 2026 | 7:23 AM

राज्यात पावसाची भीषण परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पावसाने पाठ फिरवली. कालच राज्य सरकारकडून अनेक भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला. तसा जीआर शासनाने काढला. दुष्काळाने शेतकरी चिंतेत आहे. पिके पाण्याअभावी जळून गेली. त्यातच आता छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली परिसरात पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुका पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढला आहे. पर्लकोटा, इंद्रावती, पामुलगाैतम या तिन्ही जिल्ह्यात प्रचंड मोठा पाऊस झाला. पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भामरागड तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून बचावकार्य राबवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 525 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. गडचिरोली आणि अमरावती जिल्हात पुराचे पाणी अनेक गावात शिरले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास भामरागड पुराचे पाणी शिरले. तब्बल 300 घरे पाण्याखाली गेली. परिस्थितीत अधिक बिकड होताना दिसत आहेत. पाणी पातळीत सातत्याने मोठी वाढ होताना दिसतंय. भामरागडमध्ये रात्रीतही पुराच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसले.

पोलिस दलाच्या सी-60 जवानांनी देवदूत बनून नागरिकांना जीवनदान दिले.अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती या भागात निर्माण झाली. पुराचा धोका आता टळला आहे. पण नदी नाले आणि पुरात उतरू नये, असे आवाहन नागरिकांना प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्हा प्रशासनाचे सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. पुढील काही दिवसात पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात कोरडा दुष्काळ सरकारने जाहीर केला. पण गडचिरोली आणि अमरावती जिल्हात पावसाने मोठा कहर केल्याचे बघायला मिळतंय.

राज्यातील जवळपास जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली. पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. धरणे आणि विहिरी सप्टेंबर महिन्यातच कोरडे पडले आहेत. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, तिच स्थिती सप्टेंबर महिन्यातही बघायला मिळतंय. जुलै महिन्यात फक्त चांगला पाऊस झाला. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. एल निनोचे संकट मॉन्सूनवर असल्याचे सांगितले जात होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us