Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, चार जणांचा मृत्यू

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, चार जणांचा मृत्यू
Corona Update

| Edited By: चेतन पाटील

Jul 10, 2021 | 11:43 PM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 10 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 10 Jul 2021 10:15 PM (IST)

  लसीकरणच झाले नाही तर तिसरी लाट रोखणार कशी? खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सवाल

  गेल्या काही दिवसापांसून पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण वारंवार बंद ठेवले जाते. लसीकरण संदर्भात बोलताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे म्हणणे आहे की, केंद्राने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपण तिसरी लाट संदर्भात बोलतोय. लसीकरण झाले नाही तर तिसऱ्या लाटेला रोखणार कसे? असा सवाल खासदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक महापालिकेला आणि राज्याला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध केली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे

 • 10 Jul 2021 07:06 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 320 नवे कोरोनाबाधित, 10 जणांचा मृत्यू

  पुणे : दिवसभरात ३२० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३०२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५. -२३१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८१५४७. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०३१. – एकूण मृत्यू -८६४७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६९८६९. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७२२६

 • 10 Jul 2021 07:04 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, चार जणांचा मृत्यू

  नाशिक : 

  आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 171

  आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 134

  नाशिक मनपा- 058 नाशिक ग्रामीण- 076 मालेगाव मनपा- 000 जिल्हा बाह्य- 000

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 8424

  आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 04 नाशिक मनपा- 00 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 04 जिल्हा बाह्य- 00

 • 10 Jul 2021 07:03 PM (IST)

  अकोला जिल्ह्यात दिवसभरात दोन नवे कोरोनाबाधित, आठ जणांना डिस्चार्ज

  अकोल्यात कोरोना अपडेट :

  अकोल्यात आज दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एक मृत्यू

  आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 56507 जणांनी कोरोनावर मात केली आहे

  तर सध्या 44 रुग्ण उपचार घेत आहेत

  तर दिवसभरात 8 जण कोरोना मुक्त झाले आहेत

 • 10 Jul 2021 03:50 PM (IST)

  ठाण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळी जाण्यास नागरिकांना बंधी

  ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेल्टा व्हेरियन्ट व्हायरसमुळे ठाणे जिल्हा हा तिसऱ्या लेव्हलमध्ये पुन्हा जैसे थे प्रमाणे आला आहे. त्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध लादले आहे. करोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाण्यालगत असणारे मुंब्रा देवी डोंगराच्या बाजूला असणारा धरण, तलाव, नदी पात्र, ओढे आणि धबधब्यावर मुंब्रा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

 • 10 Jul 2021 01:29 PM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

  रत्नागिरी -

  रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

  मानसिक ताण, अपुऱ्या मनुष्यबळा अभावी डॉक्टर हतबल

  राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षकांचं जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी पत्र

  डॉक्टरांअभावी कोविड सेंटर कसं चालवणार? ड़ॉक्टरांचा पत्रात सवाल

  डॉक्टर मेस्त्री यांच्या पत्रामुळे डॉक्टरांची हतबलता समोर

 • 10 Jul 2021 12:54 PM (IST)

  नांदगाव येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

  मनमाड -

  नांदगाव येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

  लस घेण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या लागल्या मोठ्या रांगा

  लसीचे 200 डोस उपलब्ध झाले असून त्यासाठी हजार पेक्षा जास्त नागरिकांनी केली गर्दी

  लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती झाली निर्माण

  नगरपरिषदेचा नियोजन शून्य कारभार पुन्हा आला समोर

 • 10 Jul 2021 12:54 PM (IST)

  वर्ध्यात मास्क न लावल्याचा कारणावरून शिवसैनिक आपसात भिडले

  वर्धा

  - मास्क न लावल्याचा कारणावरून शिवसैनिक आपसात भिडले

  - एका गटाकडून संपर्क प्रमुखाला मारल्याचा दावा तर दुसऱ्या गटाकडून शिवप्रसाद दिल्याचा दावा

  - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमोर घडला प्रकार

  - वर्धेच्या स्थानिक विश्राम गृहात शुक्रवारी घडली घटना

  - शनिवारी घटनेचं व्हिडीओ व्हायरल

  - मास्क न लावताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत स्वागताला जात असल्याच्या कारणातून वाद

 • 10 Jul 2021 12:53 PM (IST)

  खारघरमधील पांडवकडा परिसरात पर्यटकांची गर्दी

  खारघरमधील पांडवकडा परिसरात पर्यटकांची गर्दी

  पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली

  पांडवकडा परिसरात जाण्यास परवानगी नाही

  मात्र छुप्या रस्त्याने पर्यटक पांडवकडा परिसरात जाताना पाहायला मिळत आहे

  काही दिवसांआधी 3 पर्यटक वाहून गेले होते

  त्यातील एका पर्यटकाचा पांडवकडा परिसरात झाला होता मृत्यू

 • 10 Jul 2021 10:04 AM (IST)

  ठाण्यात आज लसीकरण बंद राहणार

  लसीकरणाच्या तुडवड्या मुळे ठाण्यात आज लसीकरण बंद राहणार

 • 10 Jul 2021 10:02 AM (IST)

  गेल्या 24 तासांत भारतात 42 हजार 766 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

  गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 766 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

  तर 1206 रुग्णांना प्राण गमवावे लागले

  कालच्या दिवसात देशात 45 हजार 254 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

 • 10 Jul 2021 09:57 AM (IST)

  पनवेलमध्ये लस घेण्याआधी अँटिजन किंवा rt-pcr चाचणी करणे बंधनकारक

  पनवेल

  लस घेण्याआधी अँटिजन किंवा rt-pcr चाचणी करणे बंधनकारक

  कोवीड रिपोर्टर निगेटिव्ह आल्यावरच लसीकरण करावे

  पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी काढले पत्र

  सर्व खाजगी लसीकरण केंद्र आणि वर्कपलेस cvc यांना पत्राद्वारे बजावले आदेश

  जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत देण्यात आले निर्देश

  लसीकरणासाठी कोविड चाचणीचा अट्टाहास कशासाठी नागरिकांचा सवाल

 • 10 Jul 2021 09:04 AM (IST)

  3 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर नाशिक शहरात आज होणार लशीकरण

  सोलापूर - 3 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर शहरात आज होणार लशीकरण

  अठरा वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी होणार लसीकरण

  प्रत्येक केंद्रावर 180 ऑन दी स्पॉट नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार

 • 10 Jul 2021 08:21 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम

  कोल्हापूर :

  कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम

  जिल्ह्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आजून ही 17.96 टक्यावर

  पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वगळता इतर दुकान बंद ठेवावी लागणार

  मात्र सोमवार पासून दुकान पूर्ववत उघडण्यावर व्यापारी ठाम

 • 10 Jul 2021 08:19 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16 ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्वित

  पुणे

  पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16 ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्वित

  त्यामधून 12 हजार 994 ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढली तर, आणखीन 43 प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  हे सर्व प्लांट कार्यान्वित झाल्यावर जिल्ह्यात एकूण 41 हजार 762 ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढणार

  तपुणे शहर कार्यक्षेत्रात 6, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात 2 तर ग्रामीणमध्ये 8 प्लांट कार्यान्वित आणखीन 43 प्लांटचे काम सुरू

 • 10 Jul 2021 08:01 AM (IST)

  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास प्रशासन सज्ज, नागपूर जिल्हयात मातांच्या लसीकरणाला प्राधान्य

  नागपूर -
  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास प्रशासन सज्ज
  नागपूर जिल्हयात मातांच्या लसीकरणाला प्राधान्य
  2 लाख 14 हजार बालकांच्या मातांना लाभ
  नागपूर जिल्ह्यात राबविणार अभिनव उपक्रम
 • 10 Jul 2021 07:52 AM (IST)

  नागपुरात लसीकरणाचा खेळखंडोबा सुरुच, आजही लसीकरण नाही

  - नागपुरात लसीकरणाचा खेळखंडोबा सुरुच

  - नागपुरात आज पुन्हा कोरोना लसीकरण बंद

  - कोव्हीशिल्ड लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद

  - शहरात सर्व वयोगटातील नागरीकांचं लसीकरण आज बंद

  - महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांची माहिती

  - नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला आणि दूसरा डोस मिळणार

 • 10 Jul 2021 07:07 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यातील निर्बंध 19 जुलैपर्यंत कायम राहणार

  - नागपूर जिल्ह्यातील निर्बंध १९ जुलैपर्यंत कायम राहणार

  - नागपूर जिल्हा प्रशासनाने जारी केले नवे आदेश

  - या आदेशानुसार दुकानं चार पर्यंत सुरु राहणार

  - शनिवार आणि रविवार विकेंड लॅाकडाऊन लागू

  - आज आणि उद्या अत्यावश्यक सेवेचे दुकानं सुरु राहणार

  - डेल्टा प्लसच्या भितीनं नागपूर जिल्हा लेव्हल तीन मध्ये

 • 10 Jul 2021 06:46 AM (IST)

  अकोल्यात आज 6 कोरोनाबाधितांची नोंद, एकाचा मृत्यू

  अकोल्यात काल 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

  आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56,499 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

  तर सध्या 43 रुग्ण उपचार घेत आहेत.

  कालच्या दिवसात 69 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 • 10 Jul 2021 06:45 AM (IST)

  लसी न मिळाल्याने अंबरानथ-बदलापुरात शनिवारी, रविवारी लसीकरण बंद

  अंबरनाथ आणि बदलापुरात उद्या लसीकरण बंद राहणार

  शासनाकडून लसी न मिळाल्याने उद्या लसीकरण बंद राहणार

  रविवारी लसीकरणाला सुट्टी असते, त्यामुळे आता थेट सोमवारी लसीकरण सुरू होणार

Published On - Jul 10,2021 6:27 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें