पंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन

पंढरपूर येथील भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण उर्फ वा. ना. उत्पात यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे (Corona death of Vasudev Narayan V N Utpat in Pandharpur Solapur).

पंढरपुरात वासुदेव नारायण यांचं कोरोनामुळे निधन

सोलापूर : पंढरपूर येथील भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण उर्फ वा. ना. उत्पात यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे (Corona death of Vasudev Narayan V N Utpat in Pandharpur Solapur). ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

वा. ना. उत्पात यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यांनी विठ्ठल मंदिरात 25 वर्षे श्रीमदभागवत कथा आणि रुक्मिणी स्वयंवर कथेचे वाचनही केले. वासुदेव नारायण हे हिंदुत्वावादी विचारसरणीसाठी ओळखले जात होते. त्यांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास होता. त्यांनी सावरकर साहित्याचा प्रसारही केला.

सावरकरांच्या विचारांचे साहित्य संमेलन सुरु करण्याची संकल्पनाही वासुदेव नारायण यांनीच मांडली. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषवले होते. वा. ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण आणि आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नावांपैकी एक नाव आहे. त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही भुषविले होते. शिवाय ते पंढरपुरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘पंढरपूर एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष देखील होते.

वासुदेव नारायण हे कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली. भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू आणि क्रांती मंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय देखील केली होती.

ते आणीबाणीमध्ये दीड वर्षे तुरुंगवासात होते. तसेच साप्तहिक प्रहारचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी विविध विषयांवर जवळपास 18 पुस्तके लिहिली आहेत. दरम्यान, कोरोनामुळे पंढरपूरचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी माजी आमदार सुधाकपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह.भ.प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे.

संबंधित बातम्या :

लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता, WHO चा इशारा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन

बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार

Corona death of Vasudev Narayan V N Utpat in Pandharpur

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *