
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात बुधवारी दिवसभरात 18 हजार 67 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 36 हजार 281 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.तर 79 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 113 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 42 रुग्णांची नोंद नागपूरमध्ये झालीय. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 18 रुग्ण आढळले आहेत.नवी मुंबईत 13 पुणे शहरात 6 अमरावती मध्ये 4 आणि साताऱ्यात 3 रुग्ण आढळलेत. आतापर्यंत राज्यात 3334 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.1701 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख कोरोना पॉझिटिव्ह, लातुर दौरा संपल्या नंतर चाचणी आली पॉझिटिव्ह, मुंबईत घरीच घेत आहेत उपचार, सौम्य लक्षणे.