Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : सोमवारपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू, शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा

| Updated on: Jan 21, 2022 | 11:37 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : सोमवारपासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू, शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आढावा
ठाणे ग्रामीण कोरोनामुक्त
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावी असे सर्व वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून शाळा सुरु होतील. तर दुसरीकडे  राज्यात मुंबई वगळता राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात काल दिवसभरात 46197 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 37 जणांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 52025 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.