मस्तच! पुण्यापाठोपाठ ठाणेही सावरतंय; ठाण्यात 76 टक्के खाटा रिक्त

| Updated on: May 26, 2021 | 11:54 AM

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असतानाच ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. (coronavirus: 76 percent hospital beds empty in thane)

मस्तच! पुण्यापाठोपाठ ठाणेही सावरतंय; ठाण्यात 76 टक्के खाटा रिक्त
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

ठाणे: पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असतानाच ठाण्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. नवे रुग्ण कमी प्रमाणावर सापडत असून जुन्या रुग्णांना डिस्चार्ज मिळत असल्याने ठाण्यातील रुग्णालयांमध्ये एकूण 4 हजार 583 खाटांपैकी 3 हजार 493 खाटा रिक्त आहेत. म्हणजे ठाण्यात एकूण 76.34 टक्के खाटा रिक्त असल्यांच दिसून आलं आहे. (coronavirus: 76 percent hospital beds empty in thane)

ठाणे महापालिकेने शहरात चाचण्यांची वाढविलेली संख्या तसेच कोरोना रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून आतापर्यंत एकूण आजपर्यंत 1,20,976 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. कोविड रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून योग्य उपचारामुळे जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत, असं आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

सारथीचा फायदा

ठाण्यात ‘सारथी’ प्रकल्प अर्थात महापालिका कोविड कॅाल सेंटर कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत रोज सरासरी 100 लोकांचे तज्ज्ञ डॅाक्टर्सच्या माध्यमातून वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत असून आतापर्यंत 2 हजार 200 हून अधिक लोकांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये 29 टक्के सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले, 23 टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी संदर्भांकित करण्यात आले. 20 टक्के लोकांचे तज्ज्ञ डॅाक्टर्सच्यामाध्यमातून टेलिकौन्सीलिंग करण्यात आले तर 14 टक्के रुग्णांच्या आरोग्य स्थितीचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील काही खासगी डॉक्टर्सदेखील टेलि कौन्सिलिंगसाठी निशुल्क सेवा देत आहेत. त्याचाही फायदा कोरोना रोखण्यात झाला आहे.

एक हजार रुग्णांवर उपचार सुरू

ठाण्यात पालिकेच्या आणि खासही रुग्णालयात मिळून एकूण 4 हजार 583 खाटा आहेत. त्यात आयसीयू आणि नॉन आयसीयू खाटांचाही समावेश आहे. या चार हजार खाटांपैकी एकूण 3 हजार 493 खाटा रिक्त आहेत. या रिक्त खात्यांपैकी 482 खाटा या आयसीयू आणि नॉन आयसीयूच्या खाटांची संख्या 3 हजार 11 आहे. तर, सध्या ठाण्यातील खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयात मिळून 1 हजार 84 खाटा रिकाम्या आहेत.

राज्यात 36,176 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात काल मंगळवारी 36,176 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 52,18,768 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,26,155 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (coronavirus: 76 percent hospital beds empty in thane)

 

संबंधित बातम्या:

Mumbai Lockdown: तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक; पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डोंबिवली सज्ज; 70 बेड्सचा बालरोग विभाग सुरू करणार

रस्त्याच्या पलिकडचा बॉल पकडण्याचा प्रयत्न, कचऱ्याच्या ट्रकने चिमुकल्याला चिरडलं

(coronavirus: 76 percent hospital beds empty in thane)