Ramesh Mhatre: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेची तुरुंगात प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात हलवले

Ramesh Mhatre Health Deteriorates: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची तुरुंगात प्रकृती खालावली आहे. त्यांना आधारवाडी जेलमधून थेट सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवले आहे.

Ramesh Mhatre: डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेची तुरुंगात प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात हलवले
Ramesh Mhatre Hospitalised
| Updated on: Nov 13, 2026 | 9:56 PM

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची तुरुंगात प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना नेमका कोणता त्रास झाला, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केल्याचा आरोप नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर आहे. या घटनेनंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीमुळे वैद्यकीय क्षेत्रातूनही संताप व्यक्त करण्यात आला होता.

Loading...

या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू होती. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रमेश म्हात्रे यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर ते कारागृहात होते. मात्र, आता तुरुंगात असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आधारवाडी कारागृहात असताना रमेश म्हात्रे यांची अचानक प्रकृती खालावली. ही बाब लक्षात येताच कारागृह प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. त्यांना पुढील उपचारांसाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांना नेमका कोणता त्रास झाला, प्रकृती अचानक का खालावली आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

रुग्णालयातील डॉक्टरांकडून यासंदर्भात काय माहिती दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे. डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या रमेश म्हात्रे यांच्या प्रकृतीबाबतची ही माहिती समोर आल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि पुढील उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us