AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दु:खी असताना कार्तिक आर्यन 44 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकतो, आजही हे गाणं प्रचंड लोकप्रिय

अमेरिकन बायोग्राफिकल ड्रामा 'I Play Rocky'च्या प्रीमियर सोहळ्याला नुकतीच कार्तिक आर्यनने उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्याने त्याचे सर्वात जास्त आवडते गाण्याबद्दल खुलासा केला आहे.

दु:खी असताना कार्तिक आर्यन 44 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकतो, आजही हे गाणं प्रचंड लोकप्रिय
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 13, 2026 | 9:43 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या एका प्रेरणादायी भाषणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो अमेरिकन बायोग्राफिकल ड्रामा ‘I Play Rocky’च्या प्रीमियर सोहळ्याला उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने स्वप्न, प्रेरणा आणि जिद्द याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. त्याचे हे भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘I Play Rocky’ या चित्रपटाबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला की, हा चित्रपट अशा प्रत्येक व्यक्तीशी जोडला जाईल, जिला कधी ना कधी तिची स्वप्नं पूर्ण होऊ शकत नाहीत, असं सांगण्यात आलं आहे. अनेकदा लोक आपल्याला ‘हे शक्य नाही’, ‘तू हे कधीच करू शकणार नाहीस’ असं म्हणतात. मात्र, अशा परिस्थितीतही आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे.

कार्तिक म्हणाला, ‘हा चित्रपट अशा सर्व लोकांबद्दल आहे, जे स्वप्न पाहतात आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात. ज्यांना अनेकदा हे शक्य नाही किंवा तू हे कधीच करू शकणार नाहीस, असं सांगितलं जातं. मात्र, हा चित्रपट तुम्हाला विश्वास देईल की तुम्ही काहीही करून तुमची स्वप्नं पूर्ण करू शकता’.

‘Eye of the Tiger’ हे माझ्यासाठी थीम साँग

यावेळी कार्तिकने स्वतःच्या संघर्षमय प्रवासाचाही उल्लेख केला. ‘रॉकी’ चित्रपटाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचे सांगत त्याने आपल्या आयुष्यातील एका खास गाण्याचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, जेव्हा कधी तो निराश असतो, तेव्हा 1982 मधील ‘Eye of the Tiger’ हे गाणं त्याला नव्याने प्रेरणा देतं.

कार्तिकच्या मते, हे गाणं त्याच्यासाठी एखाद्या थीम साँगप्रमाणे आहे. हे गाणं ऐकल्यानंतर तो इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांच्या दिशेने काम करण्यास सुरुवात करतो. त्यामुळेच ‘रॉकी’सारख्या चित्रपटांशी त्याचं भावनिक नातं असल्याचं त्याने सांगितलं.

‘I Play Rocky’चा पोस्ट-क्रेडिट सीन ठरणार खास सरप्राइज

प्रीमियरदरम्यान कार्तिकने प्रेक्षकांना ‘I Play Rocky’ चित्रपटाचा पोस्ट-क्रेडिट सीन अजिबात चुकवू नका असं आवर्जून सांगितलं. त्याने हा चित्रपट आधीच पाहिला असून पुन्हा एकदा पाहण्याचा विचार असल्याचंही सांगितलं. विशेष म्हणजे, चित्रपटातील पोस्ट-क्रेडिट सीन हे सर्वात मोठं सरप्राइज असल्याचं त्याने म्हटलं.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप