ज्याची भीती तेच घडतंय, पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत, चक्रीवादळामुळे..

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात चढउतार सातत्याने बघायला मिळत आहे. त्यातच आता शेतकरी राजा चिंतेत आला. चक्रीवादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. हाताशी आलेले पिक जात आहे.

ज्याची भीती तेच घडतंय, पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत, चक्रीवादळामुळे..
cyclone
| Updated on: Nov 22, 2026 | 1:30 PM

बंगालच्या खाडीत अकवान चक्रीवादळ धडले आहे. या चक्रीवादळाचा फटका अनेक राज्यात बघायला मिळाला. ओडिसा या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. अकवान चक्रीवादळाचा फटका भंडारात बघायला मिळतोय. बदलत्या हवामानाने शेतकरी चिंतेत आहेत. भंडारा जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तूर आणि धान पिकांवर संक्रांत. ढगाळ वातावरण अन् रिमझिम पावसामुळे तुरीची फुलगळ होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. कापणीला आलेल्या धानाचेही नुकसान होण्याची चिंता आहे. अल निनोचा फटका, वाढता खर्च आणि आता अवकाळी पावसाचे संकट, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहेत. अकवान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात हवामानात मोठा बदल झाला असून मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या जिल्ह्यात तूर पीक फुलोरा अवस्थेत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीची फुले गळणे, शेंगा लागण्याचे प्रमाण कमी होणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे, अनेक भागांत धान पीक कापणीला आले असून काही शेतकऱ्यांनी कापलेले धान वाळवण्यासाठी ठेवले आहे.

Loading...

संभाव्य मुसळधार पावसामुळे या पिकांचेही नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची कमतरता आणि दुष्काळी परिस्थिती आधीच जाणवत आहे. त्यात उत्पादन खर्च आणि वाढत्या मजुरीचा भार असताना आता हवामानाच्या बदलत्या स्थितीमुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कृषी विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. शेतकरी संकटात आहेत. त्यातच पावसाचे संकट आहे. राज्यात एक तर दुष्काळाचे मोठे संकट आहे. त्यातच थोड्याफार प्रमाणात आलेले धान्यही शेतकऱ्यांच्या हातातून निघून जाताना दिसत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. चक्रीवादळांमुळे राज्यात पाऊल कोसळत आहे. अनेक जिल्ह्यात पिण्याचा पाण्याच्या मोठा प्रश्न आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us