पावापासून बनवा मऊसूत आणि झटपट टेस्टी गुलाबजामुन! जाणून घ्या सोपी रेसिपी
घरात उरलेल्या पावापासून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट गुलाबजामुन बनवू शकता. कमी साहित्य आणि कमी वेळेत तयार होणारे हे गुलाबजामुन चवीला मऊसूत आणि टेस्टी लागतात.

- सर्वप्रथम ४ ते ५ उरलेल्या पावांची वरची तपकिरी बाजू काढून टाका. त्यानंतर पावाचे छोटे तुकडे करून घ्या.
- पावाच्या तुकड्यांमध्ये थोडे-थोडे दूध घालून चांगले मळून घ्या. त्यात १ मोठा चमचा मिल्क पावडर घालून मऊ आणि एकसारखे मिश्रण तयार करा.
- हाताला थोडे तेल किंवा पाणी लावून मिश्रणाचे छोटे, गुळगुळीत गोळे तयार करा. गोळ्यांना कुठेही भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्या.
- कढईत तेल गरम करून मध्यम ते मंद आचेवर गोळे सोनेरी-तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या. मंद आचेवर तळल्यामुळे गुलाबजामुन आतूनही व्यवस्थित शिजतील.
- एका भांड्यात १ कप साखर आणि १ कप पाणी घालून उकळवा. त्यात २ ठेचलेल्या वेलची घालून ४ ते ५ मिनिटे उकळवा. त्यानंतर गॅस बंद करा.
- तयार साखरेच्या पाकात तळलेले गुलाबजामुन घाला. किमान १ ते २ तास त्यांना पाकात भिजू द्या. गुलाबजामुन पाक छान शोषून घेतील आणि मऊसूत होतील.
Follow Us






