नागालँडमधील चकमकीत गोंदियाचे जवान प्रमोद कापगते यांना वीरमरण, सेवा निवृत्तीच्या 15 दिवस आधी शहीदत्व

| Updated on: May 25, 2021 | 10:53 PM

शहीद प्रमोद कापगते हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. नागालॅंड बॉर्डरवर सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले.

नागालँडमधील चकमकीत गोंदियाचे जवान प्रमोद कापगते यांना वीरमरण, सेवा निवृत्तीच्या 15 दिवस आधी शहीदत्व
गोंदियाच्या परसोडीचे CRPF जवान प्रमोद कापगते शहीद
Follow us on

गोंदिया : नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडीचे जवान प्रमोद विनायक कापगते यांना वीरमरण आलं आहे. शहीद प्रमोद कापगते हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते. नागालॅंड बॉर्डरवर सकाळी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले. प्रमोद कापगते हे भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे सुपुत्र होते. शहीद प्रमोद यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव परसोडी गुरुवारी इथं सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्रमोद कापगते शहीद झाल्यानं परसोडी गावावर शोककळा पसरली आहे. (CRPF jawan Pramod Kapgate martyred at Nagaland border)

शहीद प्रमोद कापगते यांचे कुटुंबिय परसोडी इथेच वास्तव्याला आहेत. प्रमोद कापगते हे बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना 2001 मध्ये केंद्रीय राखव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण परसोडीमधील जिल्हा परिषद शाळेत झालं तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी घेतलं होतं. गेल्या 20 वर्षापासून ते केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावत होते.

20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होणार होता!

महत्वाची बाब म्हणजे त्यांचा सीआरपीएफमधील 20 वर्षांचा बाँड 15 दिवसांनी पूर्ण होत होता. मात्र मंगळवारी सकाळी नागालँड बॉर्डरवर झालेल्या चकमकीत ते गोळी लागून शहीद झाले. शहीद प्रमोद कापगते यांच्य पश्चात पत्नी वंदना कापगते, मुलगा कुणाल, भाऊ राजेश कापगते आणि मोठा परिवार आहे. शहीद प्रमोद यांचे पार्थीव गुरुवारी सकाळी 8 वाजता परसोडी इथं दाखल होणार आहे. गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

इतर बातम्या :

नाशिकच्या खासगी रुग्णालयाकडून आकारलं जातंय अवाजवी बिल, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, व्हेंटिलेटर्सचा दर्जा ठरवून उगाच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका’; कोर्टाने राजकारण्यांना फटकारले

CRPF jawan Pramod Kapgate martyred at Nagaland border