एकीकडे दहीहंडीचा रोमांच, दुसरीकडे अनेक गोविंदा जखमी, आतार्यंत किती जणांवर उपचार; किती जणांचा मृत्यू

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार सीटी रुग्णालयांमध्ये 29 गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील चार गोविंदांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर 25 गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

एकीकडे दहीहंडीचा रोमांच, दुसरीकडे अनेक गोविंदा जखमी, आतार्यंत किती जणांवर उपचार; किती जणांचा मृत्यू
dahi handi govinda
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 4:52 PM

Dahi Handi Utsav : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची धूम आहे. पुणे आणि मुंबईत तर या उत्सवासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. काही गोंविंदा पथका नऊ, दहा थर रचून नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. अनेक आमदार, नगरसेवकांनी आपापल्या मतदारसंघांत मोठे दहीहंडी उत्सव आयोजित केले आहेत. सोबतच सर्वाधिक थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना लाखोंची बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच गोविंदा पथक थर रचून बक्षीस पटकावण्याचे प्रयत्न करत आहेत. घाटकोपरसारख्या ठिकाणी नृत्यांगणा गौतमी पाटील, अनेक अभिनेत्रींचे लावणी, नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, एकीकडे दहीहंडीची धूम सुरू असतानाच आता काही ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याचेही वृत्त समोर येत आहे.

विविध शासकीय आणि बीएमसी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३२गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 28 गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे 4 गोविंदांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

कोणत्या ठिकाणी किती गोविंदांवर उपचार सुरू

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार सीटी रुग्णालयांमध्ये 29 गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील चार गोविंदांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर 25 गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ईएस रुग्णालयांत 02 गोविंदा जखमी आहेत. येथील दोन्ही गोविंदांना घरी सोडण्यात आले आहे. डब्ल्यूएस रुग्णालयांत एका जखमी गोविंदाला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करून त्यालाही घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एकूण 32 गोविंदा जखमी असून 28 गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. चार गोविंदांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

मुंबईत पहिला मृत्यू

दुसरीकडे मुंबईत दहीहंडीनिमित्त पहिली दुर्घटना घडली आहे. दहीहंडी फोडताना मालाडमध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे वय 7 वर्षे आहे. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडल्याने ही दुर्घटना झाली. या गटनेत मुलाच्या डोक्याला मार लागला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us