सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ

Maharashtra Government : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ऐन महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ
DA Hike
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Feb 25, 2026 | 4:20 PM

राज्यातील सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांमी विधान परिषदेत विधायक निवेदन सादर केले आहे. त्यानंतर सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऐन महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये नेमकी किती वाढ झाली ते सविस्तर जाणून घेऊयात.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात येणार आहे. यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.

जुलै 2025 पासून वाढीव भत्ता मिळणार

महागाई भात्यातील ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार असून जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च 2026 मध्ये कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार

या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच 8.12 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. राज्य शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे.