राज्याच्या पोलीस दलात बंपर भरती, 18 हजार पोलिस भरतीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

राज्यातील तरुणांना सैन्य दलात विशेषतः पोलीस दलात नोकरी मिळण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना राज्य सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

राज्याच्या पोलीस दलात बंपर भरती, 18 हजार पोलिस भरतीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
Image Credit source: Google
| Updated on: Oct 22, 2022 | 6:55 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस भरतीची (Police Recrutment) तयारी करणाऱ्या तरूणांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी दिली आहे. येत्या आठ दिवसांत 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यात अघोषित सरकारी नोकरी बंद होती ती मोडून काढण्याचा निर्णय घेत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पोलीस भरती झालेली नसल्याने तरूणांमध्ये नाराजी होती. कोरोना काळात देखील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्णतः बंदच होती, त्यात महाविकास आघाडी सरकारने देखील पोलीस भरती करू असे जाहीर केले होते, मात्र अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे पोलीस भरती कधी होणार ? किती जागांसाठी ही पोलीस भरती असेल अशा अनेक चर्चा होत्या. अनेक तरुण सरकार कधी पोलीस भरती जाहीर करेल अशा प्रतिक्षेत होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपलेली असून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत जाहीर माहिती दिली आहे.

राज्यातील तरुणांना सैन्य दलात विशेषतः पोलीस दलात नोकरी मिळण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना राज्य सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेची जाहिरात काढणार असल्याची माहिती दिली आहे.

तब्बल 18 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची ही भरती असणार असून दिवाळीनंतर ही जाहिरात प्रसिध्द केली जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा ग्रामीण भागातील तरुणांसाठी अत्यंत महत्वाची होती, चार ते पाच वर्षापासून कुठलीही पोलीस दलाची भरती प्रक्रिया न झाल्याने तरुणाईमध्ये नाराजी होती.

दिवाळीनंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत कोणत्या विभागात किती जागा असणार ? कोणती पदे असणार याबाबत तरुणांना उत्सुकता लागून आहे.