एकनाथ शिंदे दरे गावात, काही मोठे घडणार? आज दुपारी पुन्हा…

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी वेळ मिळेल, त्यावेळी ते दरे गावात जाऊन वेळ घालवतात. शेतात अनेक नवीन प्रकारची पिके एकनाथ शिंदे यांनी घेतली आहेत. दोन दिवस ते दरे गावात मुक्कामी होते, आज परत ते मुंबईला येणार आहेत.

एकनाथ शिंदे दरे गावात, काही मोठे घडणार? आज दुपारी पुन्हा...
Eknath Shinde
| Updated on: Feb 22, 2026 | 12:11 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेले आहेत. काही महत्वाच्या घडामोडी घडण्यापूर्वी कायमच एकनाथ शिंदे दरे गावात जातात. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावात गेले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टे केले की, मी नाराज होऊन दरे गावात गेलो नव्हतो. यादरम्यानच आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दरे गावात पोहोचले होते दोन दिवस मुक्कामी होते. दरे गावातून बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपण गेल्यावर्षी सफरचंदाची बाग लावली होती. यावर्षी त्याला सफरचंद लागली आहेत. यासोबतच काजू, आवळा, अवकाडो अशी नवीन नवीन झाडे आपण लावली आहेत. यासोबतच ब्रोकलीचीही लागवड केली आहे. या भागात कुठल्या कुठल्या पद्धतीची झाडे येऊ शकतात आणि त्याची वाढ होऊ शकते हे पाहणे सुरू आहे. कारण इकडे भात आणि नाचणी याशिवाय दुसरे कोणतेही पिक नव्हते.

आता या भागात शेतकऱ्यांना बारामाही शेती करता आली पाहिजे मग हरभरा असेल गहू असेल किंवा इतर पिक असेल इथे ऊसही चांगल्या प्रकारचा येतो. ऊसाची वाढ चांगली होत आहे. भाजीपालाही मोठ्या प्रमाणात लावला आहे. बटाटे, कांदे, हिरवी मिरची आणि इतर हिरवा पालीभाजा येथे येतो, तोही चांगल्या प्रकारे.

दोन दिवसांचा दरे गावचा दाैरा संपवून एकनाथ शिंदे आज मुंबईकडे दुपारी रवाना होणार आहेत. शेतीबद्दल माहिती देताना एकनाथ शिंदे यावेळी दिसले. एकनाथ शिंदे आपल्या दरे गावातील शेतीमध्ये विविध पिके घेताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री असे मोठे पद असतानाही वेळ मिळेल, त्यावेळी एकनाथ शिंदे आपल्या गावी जाऊन वेळ घालवतात.

शेतांमध्ये अधिक वेळ घालून नवनवीन पिके कशी घेता येतील, यावर त्यांचा अधिक भर असतो. राज्यातील महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नंबर दोनचा पक्ष ठरला. भाजपासोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुका लढल्या आणि थेट अनेक महापालिकांवर सत्ता आणली.