अभिजीत दीपकेंचा ‘गुरु’ कोण? सगळं प्लॅनिंग कोण करतं? शेवटी समोर आलं, महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन!
दीपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरील आंदोलन यशस्वी करून दाखवले. त्यानंतर आता स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत देशभरातील शासकीय विद्यालयांची स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ते काम करत आहेत. आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीही ते नवे आंदोलन उभे करतायत. त्यामुळे दीपके यांचे मार्गदर्शक कोण? त्यांना सल्ले कोण देतो? त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन कोण करतो? असं विचारलं जातंय. याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

CJP Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीने सध्या देशात नवे आंदोलन उभे केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यानंतर सीजेपीकडून ‘स्कुल ठीक करो’ हे अभियान चालवण्यात आले. अजूनही हे अभियान सुरू आहे. आता सीजेपीने ‘इकेल्शन कमिशन ठीक करो’ ही मोहीम हाती घेतली आहे. भारतीय निवडणूक आयोगचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही दिल्लीत पुन्हा एकदा नवे आंदोलन चालू करू असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीत नवे आंदोलन उभे राहू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. याच कारणामुळे दीपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, दीपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरील आंदोलन यशस्वी करून दाखवले. त्यानंतर आता स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत देशभरातील शासकीय विद्यालयांची स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ते काम करत आहेत. आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीही ते नवे आंदोलन उभे करतायत. त्यामुळे दीपके यांचे मार्गदर्शक कोण? त्यांना सल्ले कोण देतो? त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन कोण करतो? असं विचारलं जातंय. याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
अभिजित दीपके यांचे मार्गदर्शक कोण?
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती कोण, याची चर्चा सध्या सुरू आहे. अजिंक्य शिंदे हे दीपके यांचे मार्गदर्शक असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती CJP चे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी दिली असून, दीपके यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यात एक व्हिडीओ कॉल झाला. या व्हिडिओ कॉलमध्ये शिंदे यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाली. रांका यांच्या म्हणण्यानुसार, CJP स्थापन होण्यापूर्वीपासूनच शिंदे दीपके यांना मार्गदर्शन करत आहेत.
जंतर-मंतर आंदोलनातही महत्त्वाची भूमिका
नीट पेपर लीकच्या मुद्द्यावर झालेल्या जंतर-मंतर आंदोलनाच्या व्यवस्थापनात अजिंक्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजदावली होती. तशी माहिती रांका यांनी दिली. आंदोलकांची व्यवस्था, स्वयंसेवकांची टीम तयार करणे आणि गर्दीचे व्यवस्थापन यासारख्या कामांची जबाबदारी शिंदे यांनी सांभाळली होती. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनापूर्वी त्यांचा संपर्क काही मोजक्या सहकाऱ्यांशी होता. मात्र, आंदोलनादरम्यान तयार झालेली स्वयंसेवकांची टीम पुढे देशभरात काम करू लागली आणि ती टीम उभी करण्यात शिंदे यांचा मोठा वाटा आहे.
CJP मध्ये शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी
ऑगस्ट 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या CJPच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अजिंक्य शिंदे यांची National Organisation In-Charge म्हणून नियुक्ती करण्यात आली. संघटनेचा विस्तार आणि विविध पातळ्यांवरील संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अजिंक्य शिंदे यांचा यापूर्वी आम आदमी पक्षाशी संबंध राहिला आहे. विशेष म्हणजे अजिंक्य शिंदे हे महाराष्ट्रातीलच आहेत. शिंदे आणि दीपके हे अगोदरपासूनच एकमेकांना ओळखायचे.
