मोठी बातमी! मनसेला सोबत घेण्यावर स्पष्टच बोलले एकनाथ शिंदे, थेट म्हणाले…

बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. यादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर बनावे आणि ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले.

मोठी बातमी! मनसेला सोबत घेण्यावर स्पष्टच बोलले एकनाथ शिंदे, थेट म्हणाले...
Eknath Shinde
| Updated on: Jan 23, 2026 | 2:03 PM

नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, महापालिका निवडणुकीत भाजपानंतर शिवसेना दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष ठरला. चांदा ते बांदा शिवसेना घराघरापर्यंत पोहोचली आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारणे पाहिजे आणि जम्मू काश्मीरमध्ये 302 कलम हटवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे दोन्ही स्वप्न पूर्ण केली आहेत. शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं. यादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत. मी त्यांचे अभिनंदन केले आहे. बाळासाहेब ठाकरे हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे नेते होते. आरोग्य आपल्या दारी अशाप्रकारचे अभियान आम्ही राबवत आहोत.

बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही राबवत आहोत. NDA मध्ये कायमच शिवसेनेला सन्मान मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अनेक अभियानांची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे नागरिक लोक कल्याण अभियान राबवले जाईल. 29 महापालिकांसोबतच नगरपरिषदांमध्ये हे अभियान राबवले जातंय.

याकरिता नगरविकास विभागातून मोठा निधी देण्यात आला. महिला बचत गट सक्षम करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. मराठी भाषेसाठी 100 कोटींची तरतूद, पुढील आठवड्यापासून प्लास्टिक मुक्त गड किल्ले अभियानाची सुरूवात होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अनेक अभियान सुरू करण्यात आली आहेत, ज्याकरिता मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली. कॅशलेस उपचाराची तरतूद व्यापक करणार. बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम राबविणार.

पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवणे, शिवभक्ताच्या एनजीओला एक लाख मानधन देणार ; गडकिल्ले प्लास्टिक मुक्त होणार. बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान अंतर्गत 29।महापालिका आणि 394 नगरपालिकेत राबविणार. महापालिकेला 3 कोटी आणि नगरपालिकेला 1 कोटी देणार. सर्वोत्कृष्ट शाळांना बक्षिसे देणार. पालिका क्षेत्रातील चांगल्या शाळांना 10 लाख, 7 लाख आणि 3 लाखांची अनुक्रमे बक्षिसे. महिला बचत गटासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 100 कोटींची तरतूद तर मुंबई महापालिकेकडूनही महिलांसाठी तरतूद करणार असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नुकताच राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर दोन नंबरचा पत्र शिवसेना शिंदे गट ठरला. मुंबई, कल्याण डोबिंवली, ठाणे, उल्हासनगर यासोबतच अनेक महापालिकांवर युतीची सत्ता आली. कल्याण डोबिंवली महापालिकेबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, महायुतीसोबत मनसेही आमच्यासोबत येत आहे. महापाैर पदाकरिता रस्सीखेच वगैरे काही नाही. बहुमत नसणाऱ्यांनी स्वप्न पाहणे चुकीचे आहे. विकासाच्या मुद्द्यामध्ये मनसेने आम्हाला साथ दिली.