NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात विषय संपवला Video

NCP Merger Talk : सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडतायत, त्यावरुन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर पकडला आहे. आज सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत या संबंधी प्रश्न विचारण्यात आला.

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात विषय संपवला Video
Sunetra Pawar
| Updated on: Nov 11, 2026 | 12:40 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना प्रफुल पटेल त्यांना भेटायला गेले. दोघांमध्ये चर्चा झाली, त्यात 10 तारखेनंतर बोलू असा एक संदर्भ होता. त्यावरुन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली. शरद पवार रुग्णालयातून घरी आले, त्यावेळी खासदार पार्थ पवारही त्यांना दोनवेळा भेटायला गेले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असं बोललं जाऊ लागलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून तूर्तास तरी विलिनीकरण होणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. पण तरीही विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाही. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस आणि संपूर्ण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. त्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर सुनेत्रा पवार यांनी ‘जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतील’ एवढं उत्तर देऊन विषय संपवला. त्यामुळे नेमकं पुढे काय घडणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

Loading...

हे आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही

तूर्तास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांचा बाजार गरम आहे. वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शरद पवार यांच्या भेटीची वेळ सुद्धा मागितली होती. राष्ट्रवादीचं अंतर्गत राजकारण नेमकं कुठल्या दिशेने पुढे जाणार हे आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीचे काही आमदार आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटणार आहेत. त्याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडतील असं मोठं विधान केलं आहे. शरद पवार सध्या मुंबईत सिल्वर ओक निवासस्थानी आराम करतायत. त्यांना विविध नेतेमंडळी भेटून जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us