मी घासून आणि ठासून महाविकास आघाडीतच राहणार, राऊतांनी संशय घेतलेले भुयार म्हणतात, मलाही फोन आला होता

| Updated on: Jun 23, 2022 | 5:34 PM

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर करत, या आमदारांनी आम्हाला मतदान केलं नसल्याचा आरोप केला होता. त्यात देवेंद्र भुयार यांचंही नाव घेतलं होतं.

मी घासून आणि ठासून महाविकास आघाडीतच राहणार, राऊतांनी संशय घेतलेले भुयार म्हणतात, मलाही फोन आला होता
देवेंद्र भुयार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सेनेतील आमदार आणि अपक्षांसह तब्बल 42 आमदारंचा आपल्याला पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. तर याबंडामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना ही शिंदेच्या गोठात गेल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे ठाकरे यांची शिवसेना आहेच आता कुठे असा प्रश्न अनेकांना पडत आहे. याच दरम्यान आम्हाला सत्ता नको, शिवसेना ठिकण्यासाठी मी राजीनामा देतो, फक्त समोर येऊन बोला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच आपल्या फेसबुक लाईव्हमधून स्पष्ट केलं आहे. तर त्यानंतर शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आम्ही विरोधात बसू आधी येथे या असं म्हणत हा डाव भाजपने आखल्याचा आरोप केला होता. तर शिंदेच्या कचाट्यात आसणारे अनेक आमदार हे आपल्या संपर्कात असून ते फक्त दबावामुळे त्यांच्याबरोबर असल्याचेही राऊत म्हणाले होते. याचदरम्यान आता देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, मला देखील गुवाहटीहुन फोन आला होता. पण मी घासून आणि ठासून महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आहे. आणि महाविकास आघाडीतच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे यांनी विधानपरिषदचेचा निकाल येताच आपली नाराजी व्यक्त करताना काही आमदार घेऊन सुरत गाठली. त्यानंतर त्यांना आणखी काही आमदार जाऊन मिळाले. ही आमदारांची सख्या वाढतच राहीली जी आता 42 च्या घरात गेली आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर राऊत यांनी भाजपच्या नादाला लागून शिंदे यांनी आमदारांचे अपहरण केल्याचं म्हटलं होतं. तसेच आमदारांना केंद्रीय यंत्रणाचा ससेमिरा दाखवत यांना नेल्याचंही राऊत यांनी म्हटलं. तर जे आमदार आहेत त्यांच्याशी संपर्क केला गेला. ज्यात आमदार देवेंद्र भुयार सुद्धा आहेत. भुयार यांनी आपल्याला ही शिंदे यांनी विचारणा केल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच गुवाहटीहुन फोन आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्याबरोबर गेल्यास आपल्याला मंत्री पद देऊ अशी ऑफर देण्यात आल्याचेही भुयार यांनी सांगितलं. मात्र ती ऑफर मी नाकारली. तर मी घासून आणि ठासून महाविकास आघाडीचा आहे. आणि महाविकास आघाडीतच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

याच्या आधी राऊत यांनी केला होता आरोप

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर करत, या आमदारांनी आम्हाला मतदान केलं नसल्याचा आरोप केला होता. त्यात देवेंद्र भुयार यांचंही नाव घेतलं होतं. त्यामुळे, देवेंद्र भुयार यांनी राग व्यक्त करत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, हॉटेल ग्रँड हयात येथे जाऊन संजय राऊत यांचीही भेट घेतली. त्यात त्यांनी, मी शिवसेनेविरोधात आहे, त्यातूनच शिवसेनेचा पराभव झाल्याचा काहींचं म्हणण होतं आणि त्याचं खापर अपक्ष आमदारांवर आणि पर्यायाने माझ्यावर फोडण्यात आल्याचं म्हटलं होतं.