आता 300 स्क्वेअर फुटाचं घर मोफत, देवेंद्र फडणवीसांची थेट मोठी घोषणा, नेमका विषय काय?

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील आपल्या भाषणात सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आता 300 स्क्वेअर फुटाचं घर मोफत, देवेंद्र फडणवीसांची थेट मोठी घोषणा, नेमका विषय काय?
CM Fadnavis Big Announcement
Image Credit source: X
| Updated on: Jul 26, 2026 | 7:19 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूर महापालिका सफाई कर्मचारी नियुक्ती पत्र वितरण सोहळा तसेच महापालिका आपली बस व्हाट्स अप तिकीटिंग सेवा लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात या कर्मचाऱ्यांना घर देण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

मी महापौर असताना…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘बऱ्याच वर्षांनी मला महापालिकेच्या हिरवळीवर येण्याची मला संधी मिळाली. हा कार्यक्रम दुसरीकडे होणार होता, पण महापौरांनी इथेच कार्यक्रम घेण्याचा आग्रह केला आणि मला इथे येण्याची संधी मिळाली, माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी महापौर असताना इथे अनेक कार्यक्रम घेतले अनेक दिग्गजांचे सत्कार केले. स्वच्छता दूतांचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न होते ते सुटले आणि आज त्यांना नियुक्ती पत्र दिले जात आहे.’

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘लाडपागे समितीने या नियुक्त्यांसंदर्भात अहवाल दिला होता, मात्र तो अहवाल लागू करण्यात येत नव्हता. तो आम्ही बाहेर काढला आणि त्यावर काम केलं पाठपुरवा केला आणि त्यानुसार नियुक्त्या दिल्या. 2015 वर्षी मी मुख्यमंत्री असताना लाडपागे समिती ही फक्त महापालिकेसाठी नाही तर सगळ्याच राज्यातील सफाई कर्मचारी यांच्या साठी आहे हे दाखवून दिलं आणि त्या अहवालाची अंमलबजावणी केली.

सफाई कर्मचाऱ्यांना 300 स्केअर फूटच घर मोफत मिळणार

सुरवातीला सफाई कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळत होता, तो नियमाप्रमाणे मिळावा यासाठी सुरवात केली. शहरात 4 हजार 407 नियुक्त्या देण्यात आल्या, यामुळे अस्थापणाचा खर्च वाढत होता त्यामुळे त्याला त्यातून बाहेर काढलं. लाडपागे समिती विरोधात काही लोक कोर्टात गेले मात्र ती लढाई आपण लढलो आणि जिंकलो. मी मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर या कर्मचाऱ्यांना मोफत घर देण्याची योजना बंद करण्यात आली होती. मात्र मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर ती योजना पुन्हा सुरू केली. 300 स्केअर फूटच घर मोफत आणि त्यापेक्षा मोठं हवं असल्यास काही रक्कम त्यांना भरावी लागणार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काम करणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘शहर स्वच्छ ठेवण्याचा काम हे लोक करतात त्यांच्या प्रगती साठी आमचंही काही कर्तव्य आहे हे आम्हाला माहीत आहे. पुढच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहे. मोठ्या इमारती तयार होत आहेत, त्या ठिकाणी मेंटनन्ससाठी याच लोकांनी आपल्या संस्था स्थापन करून कौशल्याने कामे करावी. महापालिकेच्या रिक्त जागा मुळे कामांवर प्रभाव पडतो त्यामुळे या भरत्या लवकर कराव्याय देशातील वाढत्या शहरात आपलं शहर आहे त्यामुळे हे शहर स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे. मागच्या काळात सुद्धा आम्ही महापालिकेला निधी दिला पुढेही देणार त्यामुळे शहराच्या सगळ्या भागात विकास पोहचला पाहिजे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us