Anant Ambani : अनंत अंबानी असं काय म्हणाले, अचानक मुकेश अंबानी यांच्या डोळ्यात तरळले अश्रू
IPO लिस्टिंग सोहळ्यात संपूर्ण अंबानी कुटुंब हजर होते. मुकेश अंबानीनंतर आता जिओची धुरा नव्या पिढीच्या हाती पाहायला मिळाली. त्या दरम्यान अंबानीच्या तिन्ही मुलांनी भाषणं केली, पण अनंत अंबानी असं काही बोलला की त्यामुळे मुकेश अंबानीला भर कार्यक्रमात रडू कोसळले.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म चा 30, 213 कोटी रूपयांचा IPO आज 28 ऑक्टोबर 2026 रोजी शेअर बाजारात दणक्यात लिस्ट झाला. त्यासाठीच एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मुकेश अंबानी यांनी जरी Jio नेटवर्क सुरू केलं असलं, तरी त्याची धुरा अंबानीची पुढची पिढीने हाती घेतला आहे. Jio च्या क्रायक्रमाचे आयोजन आकाश, मुकेश, आणि ईशा अंबानीने केले. पण यातच काहीसे भावूक क्षण पाहायला मिळाला. भाषणादरम्यान अनंत अंबानी असं काही बोलंला की मुकेश अंबानींना थेट रडूच कोसळले.
अनंत अंबानी असं काय म्हणाले
अनंत अंबानी यांनी आपल्या भाषणात जिओच्या यशामागे देशातील ग्राहकांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. त्यांनी आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या संस्कारांचाही उल्लेख केला. रिलायन्सचा पाया रचनेचे स्वप्न आजोबा धीरूभाई अंबानी यांनी पाहिलं. जे आजीच्या आर्शिवादाने वडिलांनी सत्यात उतरवलं आणि आता त्याचा सांभाळ आम्ही करणार आहोत. त्याला आणखी वृद्धिंगत करणार आहोत.
अनंत अंबानी यांनी पुढे म्हटलं की नव्या पिढीच जिओच्या स्वप्नांचे बीज ईशा दिदीने पेरलं आणि आकाश भाईने त्याला स्वत:चं स्वप्न बनवलं. या सगळ्यासोबतच देशातील लोकांची साथ महत्त्वाची होतीच. लोकांनी दिलेल्या आशिर्वादामुळे आजं शक्य झालं आहे.त्यांच्या या बोलण्यादरम्यान मुकेश अंबानी यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
ईशा अंबानीने सांगितल्या जुन्या आठवणी
ईशा अंबानी हिने भाषणादरम्यान वडील मुकेश अंबानी यांच्या मेहनतीला उजाळा दिला. 1977 जिओाचा पहिला सार्वजनिक समभाग विक्री सुरू केली होती. तसेच ईशा अंबानी यांनी जिओच्या व्यवसायिक कामगिरीचाही उल्लेख केला. कंपनीच्या यशामागे केवळ आकडे नसून ग्राहकांचा विश्वास आणि त्यांची साथ असल्याचंही अधोरेखित केलं. तसेच आपल्या भावाचं आकाश अंबानीचंही तिने कौतुक केलं.
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर बाजारातील नोंदणीचा हा सोहळा रिलायन्स समूहासाठी महत्त्वाचा व्यावसायित टप्पा ठरला. मात्र या कार्यक्रमात कंपनीच्या यशाबरोबरच अंबानी कुटुंबातील नात्यांची आणि पुढच्या पिढीवर सोपवण्यात येणाऱ्या जबाबदारीची झलकही पाहायला मिळाली.
मुलांनी वडिलांच्या मेहनतीची जाणीव ठेवली त्याला उजाळा दिला, कुटुंबाचं स्वप्न पुढे नेण्याची तयारी केली त्यामुळे मुकेश अंबानी भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा व्यावसायिक सोहळा कौटुंबिक क्षण बनला.
