AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! जय पवार थेट सीआयडी कार्यालयात; काय आहे प्रकरण?

अजित पवार यांच्या निधनाला 9 महिने उलटले तरी अपघाताचे गूढ कायम आहे. तपासात प्रगती नसल्याने समर्थकांत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार आज सीआयडी कार्यालयात तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी गेले आहेत. सीआयडी काय माहिती देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वात मोठी बातमी! जय पवार थेट सीआयडी कार्यालयात; काय आहे प्रकरण?
jay pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 2:48 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत अजित पवार यांच्या निधनाला 9 महिने उलटून गेले आहेत. मात्र, अजूनही अजितदादांच्या अपघाताचं गूढ उकलेलं नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, या प्रकरणातील कोणताही अपडेट समोर येत नसल्याने अजितदादांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जय पवार थोड्याच वेळात सीआयडी कार्यालयात जाणार आहे. अजितदादांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी जय पवार सीआयडी कार्यालयात जात आहेत.

जय पवार थोड्याच वेळात पुणे सीआयडी कार्यालयात जाणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मागील 9 महिन्यात तपास कुठपर्यंत आला याबाबत जय पवार माहिती घेणार आहेत. त्यामुळे सीआयडी जय यांना काय माहिती देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जय पवार मीडियाशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल नाही

अजितदादा यांच्या निधनानंतर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला होता. रोहित पवार यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतचे पुरावे सादर केले होते. तसेच या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आधी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली होती. गुन्हा दाखल करून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. पण त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नव्हता.

सीबीआय चौकशी नाहीच

याच दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, आजतागायत हे प्रकरण सीबीायकडे देण्यात आलेलं नाही. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे. त्यावरून विरोधकांनी वारंवार अजितदादा गटावर हल्ला चढवला होता. सत्तेत असून देखील अजितदादांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीवर अनास्था दिसत असून अजित पवारांचं कुटुंबीय या अपघातावर काहीच बोलत नसल्याची टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज जय पवार सीआयडी कार्यालयात जात असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 9 महिने पूर्ण होत आहेत.

Follow Us
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर