Exam scam : परीक्षा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी, फडणवीसांचा रोख कुणाकडे?

जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exam scam : परीक्षा घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी, फडणवीसांचा रोख कुणाकडे?
देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 3:57 PM

मुंबई : राज्यात सध्या परीक्षा घोटाळे गाजत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यावरून आक्रमक झालेत. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. असे ट्विट करत फडणवीसांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सीबीआय चौकशीशिवाय गुंता सुटणार नाही

फडणवीसांनी ट्विट करत आरोप करताना म्हटले आहे की, आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा. असे म्हणत फडणवीसांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आधी म्हाडातील पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती. त्यानंतर हे टीईटी, पोलीस भरती घोटाळ्याचे प्रकरण त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका होत आहे. त्यानंतर फडणवीसांनी आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार याप्रकरणी कोणती कठोर पोवले उचलते? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?

राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंचा पलटवार

Onion Rate | कांद्याच्या दराचा लहरीपणा, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?