Devendra Fadnavis: ‘त्यावेळेस झोपले होते का?’ डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची विरोधकांना सणसणीत चपराक, म्हणाले हे तर लबाड…
Devendra Fadnavis on Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलावरून देशभरात हलकल्लोळ उठला आहे. इंडिया आघाडीत तर मोठे वादळ आले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची विरोधकांना सणसणीत चपराक लगावली.

Devendra Fadnavis on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर मोठा हल्लकल्लोळ उठला आहे. इंडिया आघाडीतून भाजपवर मोठा हल्लाबोल सुरू आहे. त्याचवेळी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सांगत मोठा हल्लाबोल केला. त्यांनी विरोधकांना एक खणखणीत सवाल विचारला आहे.
त्यावेळी झोपला होता का?
डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, आमच्या महिलांकरिता जागा आरक्षित होणार आहे. २०२९ च्या सर्व राज्यांच्या विधानसभेत आणि लोकसभेत ३३ टक्के जागा या महिलांकरिता आरक्षित असतील. खरं म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं, जे या बिलाला विरोध करत आहेत, त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. मला इतकंच म्हणावसं वाटतं की ते लबाडी करत आहेत. जेव्हा २०२३ मध्ये जेव्हा महिला आरक्षण बिल आणण्यात आलं होतं. तेव्हाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, हे आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणावं लागेल. त्यावेळी या सगळ्यांनी डिलिमिटेशन लागू होणार हे माहिती असून त्याला मान्यता दिली. एकमताने त्यांनी हे मान्य केलं. त्यावेळी झोपले होते का? असा खणखणीत सवाल फडणवीस यांनी विरोधकांना विचारला.
विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध
त्यावेळेस यांनी डिलिमिटेशनला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. माझा यांना सवाल आहे की, डिलिमिटेशन त्या बिलात होतं की नाही. मतदारसंघ पुनर्रचना बिलासोबतच महिला आरक्षण बिल लागू होईल, याला तुम्हीच मान्यता दिली. आता तेच मोदीजी करायला निघाले आहेत, त्यावेळी मात्र त्याला विरोध करत आहे. तुमचा विरोध डिलिमिटेशनला नाही तर महिलांच्या आरक्षणाला आहे, कारण वर्षानुवर्ष महिला आरक्षणाचा कायदा तुम्ही लोकसभेत आणायचे आणि संयुक्त समितीकडं पाठवून मारून टाकायचे असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.
त्यामुळे तुम्हाला जळजळ
मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुम्हाला जळजळ होत आहे. त्यामुळेच तुम्ही डिलिमिटेशनला मान्यता दिली आहे. ती पुन्हा द्यायची आहे. त्यामुळे आता विरोधकांनी लबाडी सोडली पाहिजे. विरोधक राजकीय हाराकिरी करत आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकला. त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.