CM फडणवीस यांचा राहुल गांधींवर सर्वात गंभीर आरोप; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील आंदोलनाचं चीन कनेक्शन सांगितलं

CM फडणवीस यांनी राहुल गांधींवर सर्वात गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील आंदोलनाचं चीन कनेक्शन सांगितलं.

CM फडणवीस यांचा राहुल गांधींवर सर्वात गंभीर आरोप; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील आंदोलनाचं चीन कनेक्शन सांगितलं
devendra fadnavis news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 12:10 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकतंत्र बचाव’ यात्रेतील सभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांकडून काढण्यात येणार्‍या मोर्चावर फडणवीसांनी आक्षेप घेतला. विरोधक मोर्चा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम करत आहेत. आता काँग्रेसला चीनकडून डोनेशन कसं मिळतं, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांच्यासारखे राहुल गांधी देखील नागरिकांचे मुलभूत अधिकार संपवण्यासाठी मोर्चा काढत असल्याचा आरोप देखील केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘इंदिरा गांधींचा नातू आता पुन्हा तेच घेऊन रस्त्यावर उतरला आहे. दारू तीच आहे, फक्त बॉटल बदलली आहे. दारू तीच आहे. आता निती बदलली आहे. राहुल गांधी हे रोज व्हिएतनाम, थायलंडला जातात, तिकडे कशासाठी जातात. मी राहुल गांधींना सवाल करतो. भारताला पाण्यात पाहण्यासाठी, घुसखोरी करण्यासाठी कोणता देश आतूर आहे, तर तो चीन आहे. मग राहुल गांधी मला सांगा, चीनकडून काँग्रेस आणि तुमच्या ट्रस्टला डोनेशन का मिळत आहे. चीनच्या पैशांवर भारतात अराजकता तयार करत आहात’.

Loading...

‘अराजकता निर्माण करण्याचं एक कारण आहे….एक नवीन लाल पुस्तक आहे. लाल संविधान हा केवळ मास्क आहे. मुखवटा आहे. लाल पुस्तकाचा वापर करत षडयंत्र रचत आहे. याच लाल पुस्तकाचा वापर करून नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशचं संविधान बदललं आहे. हीच त्यांची इकडे निती आहे. हातात लाल संविधान ठेवता. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम करत आहात. संविधान खराब म्हटलं तर लोक जोड्याने मारतील. त्यामुळे संविधान खराब म्हणत नाही. त्यामुळे संविधानाने तयार केलेली संस्थांना बदनाम केले जात आहेत. आधी आरबीआय, सीएजी खराब असल्याचे सांगतात. नंतर संसद संपवा म्हणत  रस्त्यावर निर्णय करा. ते संसद, निवडणूक आयोगाला शिव्या देतात. आता देशाच्या न्यायालयाला देखील शिव्या देत आहेत. हीच अराजकता आहे, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us