बीड जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करा, धनंजय मुंडेंची अजित दादांकडे मागणी; DPDC च्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

या बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी गेल्या चार वर्षातील पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त वातावरण करण्याबद्दल तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे मत व्यक्त केले.

बीड जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करा, धनंजय मुंडेंची अजित दादांकडे मागणी; DPDC च्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
ajit pawar dhananjay munde
| Updated on: Jan 30, 2025 | 6:31 PM

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बीडमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री अजित पवार, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी गेल्या चार वर्षातील पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त वातावरण करण्याबद्दल तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे मत व्यक्त केले.

धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बीड जिल्ह्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी बीड जिल्ह्याची बदनामी थांबावा, यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

अधिकारी कर्मचाऱ्यांवर भीती व दडपणाचे वातावरण

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही. कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही, त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी – कर्मचारी यांच्यावरती भीती व दडपणाचे वातावरण आहे.

बीड जिल्ह्याची बदनामी थांबावी

अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील? त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात आहे. सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे केली आहे.

सर्व तालुक्यांना समान निधी द्या

बीड जिल्हा पोलिस दलास आवश्यक ७३ नवीन वाहने, ११३ मोटार सायकल या बाबी नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आल्या. अशी अनेक सकारात्मक कामे करताना सर्व तालुक्यांना समान निधी देण्याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. ऐकीव आणि अर्धवट माहितीच्या आधारे नियोजन समितीच्या कामकाजावर मागील काही दिवसात करण्यात आलेल्या निराधार आरोपांना पुरावण्यांसह खोडून काढण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून केले जाईल, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.