व्हॉट्स ॲप प्रोफाइलवर ‘तो’ फोटो ठेवणं महागात; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

3 People Arrest For Whatsapp Profile : व्हाट्स अप प्रोफाइलवर पिस्टल हातात धरून फोटो ठेवला. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणी तीन जण ताब्यात घेण्यात आलं आहे. परंडा पोलिसांनी कारवाई तिघांवर कारवाई केली आहे. परंडामध्ये नेमकं काय झालं? वाचा सविस्तर...

व्हॉट्स ॲप प्रोफाइलवर तो फोटो ठेवणं महागात; तीनजण पोलिसांच्या ताब्यात
व्हॉट्सअॅप प्रोफाईल
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 01, 2024 | 3:45 PM

व्हॉट्स ॲप… तुम्ही आम्ही सगळेच हे ॲप वापरतो. त्यावरचा प्रोफाईल फोटो म्हणजे आपली ओळख असते. तो अधिक चांगला असावा याकडे वापरकर्त्यांचं लक्ष असतं. पण याच व्हॉट्स ॲप प्रोफाईल फोटो ठेवणं तिघाजणांना महागात पडलं आहे. व्हॉट्स ॲप प्रोफाइलवर पिस्तूल हातात धरून ठेवलेला फोटो व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील ही घटना आहे. परंडा पोलिसांनी या तिघांवर कारवाई केली आहे. पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत.

अन् तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील युवकाने व्हॉट्स ॲप प्रोफाइल वरती पिस्तूल हातात धरून फोटो ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर सदरील फोटो पाहून त्याचा शोध घेतला. त्या तरुणास परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने पिस्तूलसह तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांची सध्या कसून चौकशी सुरु आहे.

परंडा शहरातील शहाजी माळी याने त्याचे व्हॉट्स ॲप प्रोफाइलवरती पिस्तूल हातात धरून फोटो ठेवलेला आहे. ही माहिती पोलिसांनी मिळाल्यावर सदरील फोटो पाहून चौकशीला सुरुवात केली. सदरील फोटो पाहून सदरील तरुण हा शहाजी माळी आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने परंडा पोलीस ठाण्याचे पथक सदर ठिकाणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेतलं. त्याची अंगझडती घेतली. आधी त्याने हा पिस्तूल दाखवण्यास नकार दिला. पण मग त्याच्या कमरेला लावलेली गावठी पिस्तूल पोलिसांना सापडला. मग पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.

तिघांवर गुन्हे दाखल

व्हॉट्स ॲप प्रोफाइलवरील फोटो प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली. यावर पथकाने पंचासमक्ष गावठी पिस्तूल जप्त करून शहाजी माळी, ऋषिकेश गायकवाड, ओंकार सुतार यांच्याविरुद्ध परंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 व 3 ( 5 ) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे.