Dhule News: खळबळजनक! धुळ्याच्या महापौरांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dhule News: खळबळजनक! धुळ्याच्या महापौरांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु
| Updated on: Nov 22, 2026 | 2:02 PM

मनेष मसोळे, प्रतिनिधी: धुळ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विघ्नहर्ता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

धुळ्याच्या महापौरांचा टोकाचा प्रयत्न.. 

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळ्याच्या विद्यमान महापौर माया परदेशी यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत आमदार अनुप अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. महापौर माया परदेशी यांनी विष प्राशन करुन टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विघ्नहर्ता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती स्थिर!

समोर आलेल्या माहितीनुसार, धुळ्यातील संजय शर्मा यांनी महापौर माया परदेशी यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट केली होती. महापौर परदेशी यांच्याबद्दल निषेधार्य वक्तव्य केल्यानंतर महापौरांनी मानसिक धक्क्यातून टोकाचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल मात्र मानहानी सहन न झाल्याने महापौरांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.  सध्या त्यांच्यावर विघ्नहर्ता या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून परिसरात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us