AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारखान्यात असं काय घडलं की क्षणात होत्याचं नव्हतं झालं, ‘इतक्या’ महिलांचा मृत्यू

नेहमीप्रमाणे महिला कारखान्यात काम करायला आल्या. दुपारपर्यंत काम सुरळीत सुरु होते. दुपारी अचानक एकच हाहाकार उडाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

कारखान्यात असं काय घडलं की क्षणात होत्याचं नव्हतं झालं, 'इतक्या' महिलांचा मृत्यू
मेणबत्तीच्या कारखान्याला आगImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 18, 2023 | 5:58 PM
Share

धुळे / मनेष मासोळे : धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरली जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती. दुपारी पावणे 2 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली आणि या आगीत होरपळून या चौघी महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळते. चौकशीअंतीच आगीचं नेमकं कारण समोर येईल, असं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल आहे. जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागली

निजामपूर परिसरातील चिखलीपाडा येथे 25 बाय 25 च्या एका खोलीत चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याचा कारखाना सुरु होता. त्या ठिकाणी साक्री तालुक्यातील जैताणे गावातील महिला कामगार कामाला आहेत. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक त्या कारखान्यात शॉटसर्किट होऊन आग लागली. या आगीची ठिणगी चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कच्चा मालावर पडली. यामुळे ही आग आणखी भडकली.

आगीत चौघींचा होरपळून मृत्यू, दोघी जखमी

आगीत त्या ठिकाणी काम करणार्‍या आशाबाई भैय्या भागवत, पूनम भैय्या भागवत, नैनाबाई संजय माळी, सिंधूबाई धुडकू राजपूत या चार जणींचा होरपळून मृत्यू झाला. तर संगीता प्रमोद चव्हाण ही महिला 70 टक्के आणि निकीता सुरेश महाजन ही 30 टक्के भाजली. या दोघींना उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचाराअर्थ दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु

हा कारखाना पुणे येथील रहिवासी असलेल्या रोहीणी कुवर यांच्या मालकीचा असून, या कारखान्याचा कारभार जगन्नाथ रघुनाथ कुवर हे पाहतात. जगन्नाथ कुवर यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, हा कारखाना चालविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या कुवर यांनी घेतल्या होत्या का?, या कारखान्यात कुणी बालकामगार काम करीत होते का?, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर